नवी दिल्ली: जगभरात सध्या प्रदूषण आणि इंधनाच्या वाढत्या दरांमुळं आणि टंचाईमुळं इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामध्ये वाढ झाली आहे. अनेक कंपन्या यावर काम करत असून विना ड्रायव्हरच्या गाड्या देखील लवकरच पाहायला मिळणार आहे. यामध्ये काही दिवसांपूर्वीच अमेझॉननी वाहन उद्योग क्षेत्रामध्ये प्रवेश करत एक अनोखी सेल्फ ड्रायव्हिंग कार सादर केली होती त्यानंतर आता होंडाने जपान मध्ये जगातील सर्वात आधुनिक सेल्फ ड्रायव्हिंग कार लिजंड नावाने सादर केली आहे. जपान मध्ये सुरवातीला लिजंडची फक्त १०० युनिट रस्त्यावर आणली गेली असून या कारला लेव्हल ३ ऑटोनॉम्स ड्रायव्हिंग तंत्रज्ञान दिले गेले आहे. गल्ली बोळातून जाताना किंवा लेन बदल करताना अॅडप्टीव्ह ड्रायव्हिंग मॅनेज करण्याची या कारची क्षमता आहे.
देशातील ग्राहकला ऑटोनॉमस वाहनाचा अनुभव कसा येतो आणि ही वाहने प्रत्यक्ष वापरात किती व्यवहार्य ठरतात याचेही अध्ययन होंडा कडून केले जात आहे. ऑटोनॉमस वाहनात आत बसणाऱ्या व्यक्तीला नेहमीच सावध राहावे लागते हे लक्षात घेऊन होंडा लिजंडला आपत्कालीन स्टॉप फंक्शन दिले गेले आहे. ड्रायव्हरने हँडओव्हर आदेशाला प्रत्युत्तर दिले नाही तर हे फंक्शन कार्यरत होते. कार मधील मुख्य कॅमेरा युनिट सतत वाहतूक स्थिती ट्रेक करते.
त्यांनतर आता होंडा लवकरच त्यांची हायब्रिड एसयूव्ही होंडा एचआर-व्ही भारतात लाँच करू शकते. रिपोर्ट्सनुसार कंपनी दिवाळीपर्यंत ही एसयूव्ही लाँच करू शकते. तथापि, कंपनीकडून अद्याप याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. होंडाने अलीकडे थायलंडमधील बाजारात एचआर-व्ही एसयूव्हीचे थर्ड जनरेशन मॉडेल सादर केले आहे. असं म्हटलं जात आहे की कंपनी काही अपडेट्ससह ही कार भारतात लाँच करु शकते. तसेच या कारला अधिक प्रीमियम इंटिरियर आणि मजबूत हायब्रिड पॉवरट्रेन देण्यात येईल. ही नवीन एसयूव्ही अनेक आधुनिक वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल. कंपनीने दावा केला आहे की, ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये 26 किलोमीटरचं मायलेज देईल.
होंडा एचआर-व्ही हायब्रिड मध्ये कंपनीने 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आणि दोन इलेक्ट्रिक मोटर्ससह दोन लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आल्या आहेत. या कारचं इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटर्स एकत्रितपणे 109 पीएस पॉवर जनरेट करतात. हे इंटिग्रेटेड इंजिन मल्टीमोड ड्राइव्ह (iMMD) तंत्रज्ञानाने सज्ज आहे. हायब्रिड व्हर्जनव्यतिरिक्त ही कार नॅचरल एस्पिरेटेड इंडनसह उपलब्ध आहे, ज्यामध्ये 1.5-लीटर क्षमतेचे नैसर्गिक इंजिन आहे जे 121bhp पॉवर आणि 145Nm टॉर्क जनरेट करतं
या गाडीमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, होंडा कनेक्ट डिस्प्ले, पॅनारोमिक सनरूफ, वायरलेस चार्जर, ऑटोमॅटिक एसी आणि लार्ज टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिमसह फ्री पॉवर टेलगेट असेल. याशिवाय अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस), इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन (ईबीडी), रियर पार्किंग सेन्सर आणि रियर पार्किंग कॅमेरा असे फीचर्स उपलब्ध असतील.या कारच्या आकाराबद्दल बोलायचे झाल्यास, ही नवीन एसयूव्ही आधीच्या मॉडेलपेक्षा सुमारे 120 mm लांब आणि 10 mm रुंद असेल. तथापि, या कारची उंची 5 mm कमी असेल आणि व्हीलबेस 20 mm अधिक असेल. या कारच्या नवीन मॉडेलची लांबी 4450 mm, रुंदी 1780 mm, उंची 1600 mm आणि व्हीलबेस 2630 mm असेल.
महत्वाच्या बातम्या
- मंत्री धनंजय मुंडे यांचा बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा
- शहरांनतर धरणांच्या नामांतराचा मुद्दा समोर, ‘या’ प्रकल्पाचे नाव बदलण्याची मागणी
- औरंगाबादेत १०२३ कोरोनाबाधित रुग्णांची नोद, आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या
- विराट फॉर्ममध्ये परतला ; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला तिसरा कर्णधार
- मराठा आरक्षणासंदर्भात काय होणार? आज महत्वाची सुनावणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

