कोलकाता: पश्चिम बंगाल मध्ये जसा निवडणुकीचा बिगुल वाजला तसाच भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील संघर्ष देखील वाढू लागला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरुवातीच्या टप्प्यातच हिंसक बनला आहे.
नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ममता बॅनर्जी एका मंदिरात गेल्या आणि तेथून बाहेर आल्यावर त्या कारजवळ उभ्या होत्या. तिथे थांबून त्या कार्यकर्त्यांशी बोलत होत्या. त्यानंतर त्या कारमध्ये बसत असताना दरवाजा आतील बाजूस ढकलला आणि यातच त्यांच्या पायाला दुखापत झाली. या प्रकारानंतर त्यांना ताबडतोब कोलकात्याला आणण्यात आले होते.नंदिग्राम येथे प्रचारादरम्यान जखमी झाल्याने मोठ्या राजकीय वादाला तोंड फुटले होते. आपल्यावर प्रतिस्पर्धी भाजपाकडून हल्ला करण्यात आल्याचा दावा ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसकडून करण्यात येत होता. तर ममता बॅनर्जी ह्या खोटे बोलत असल्याचा दावा भाजपाकडून येत होता.
त्यानंतर आता पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्यातील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर पलटवार केला. आज आपलं हेलिकॉप्टर खराब झालं. परंतु आपण याला षडयंत्र म्हणणार नाही असं म्हणत अमित शाह यांनी ममता बॅनर्जींवर निशाणा साधला.
‘आज मला येण्यास थोडा उशिर झाला. माझ्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला होता. परंतु हे कोणाचं षडयंत्र होतं असं मी बिलकुल म्हणणार नाही,’ असं अमित शाह यावेळी म्हणाले. निवडणूक आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना झालेली दुखापत हा एक अपघात आहे. परंतु ममता बॅनर्जींच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्या मागे एक षडयंत्र आहे, असं म्हणत अमित शाह यांनी त्यांच्यावर टीका केली.तसेच दीदी (ममता बॅनर्जी) तुम्ही पूर्ण पश्चिम बंगाल व्हिलचेअरवर फिरत आहात. आपल्या पायाबाबत चिंता आहे. परंतु तुम्हाला आमच्या १३० कार्यकर्त्यांच्या मातांबद्दल मात्र कोणतीही चिंता नाही, ज्यांच्या मुलांची हत्या करण्यात आली,’ असं अमित शाह म्हणाले. त्यामुळे आता बंगाल ची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसे प्रचारचे रण तापले असून वेगवेगळ्या मुद्यांवरून मतदारांना भावनिक साद घालण्याची धडपड सध्या राजकीय पक्षांकडून सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
- मंत्री धनंजय मुंडे यांचा बार्टीच्या संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा
- शहरांनतर धरणांच्या नामांतराचा मुद्दा समोर, ‘या’ प्रकल्पाचे नाव बदलण्याची मागणी
- औरंगाबादेत १०२३ कोरोनाबाधित रुग्णांची नोद, आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या
- विराट फॉर्ममध्ये परतला ; ‘अशी’ कामगिरी करणारा बनला तिसरा कर्णधार
- मराठा आरक्षणासंदर्भात काय होणार? आज महत्वाची सुनावणी


