Share

हाच तो दिवस औरंगाबादेत आढळला होता पहिला कोरोना रुग्ण

Published On: 

औरंगाबाद : रशियातून भ्रमण करून औरंगाबाद शहरात आलेली सिडको एन-१ येथील प्राध्यापक महिला १५ मार्च रोजी कोरोना पॉझिटिव्ह निघाली आणि संपूर्ण औरंगाबाद हादरले. महापालिकेसह आरोग्य यंत्रणेची झोप उडाली. त्यानंतर पुढील पंधरा दिवस औरंगाबादेत कोरोनाचा एकही रूग्ण नव्हता. मात्र २ एप्रिल रोजी आणखी दोन रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आणि येथूनच सुरू झाली शहरातील कोरोना संसर्गाची साखळी. याच परिस्थितीत कडक लॉकडाऊन सुरु झाले.

जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यात कोरोनाचा शहरात उद्रेक झाला. मात्र अनलॉकनंतर सर्वकाही सुरळीत सुरू झाले. आता कोरोना संपला असे म्हणत नागरिक निवांत झाले. जोरदार पद्धतीने लग्न समारंभ, पार्टीज, भेटी गाठींना उत आला. आरोग्य यंत्रणा, मनपा प्रशासनही थंडावले. मात्र नागरिकांच्या याच बेपर्वाईमुळे आज पुन्हा औरंगाबाद त्याच वळणावर येऊन ठेपले आहे. विनामास्क वावरणारे, नियमांचे पालन न करणारे नागरिक शहरात नजरेस पडत आहेत. त्यामुळे आता अंशतः लॉकडाऊन लागू करावा लागला आहे.

रविवारी कोरोना रुग्णसंख्येने उच्चांक गाठला. १०२३ रुग्ण एकाच दिवसात निघाले. अशाचप्रकारे रुग्ण वाढत राहिले तर शहरात पुन्हा कडक लॉकडाऊन लागू करण्याची वेळ येऊन ठेपेल. त्यामुळे नियम पाळा आणि कोरोना टाळा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र अजूनही शहरातील नागरिकांमध्ये गांभीर्य आलेले नाही. आजही विनामास्क फिरणाऱ्यांची मोठी संख्या आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!