Share

कोरोनाचे निर्बंध फक्त सामान्य जनतेलाच ? आमदार कन्येच्या कार्यक्रमात ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग…

Published On: 

पिंपरी-चिंचवड : राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा अक्षरशः थैमान घातले आहे. राज्यात रविवारी तब्बल 16620 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे, एकूण 126231 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक भागात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तर, काही ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

देशातील सर्वाधिक अॅक्टीव्ह रुग्ण पुण्यात आहेत. पुण्यात रविवारी एकाच दिवशी १७४० रुग्णाची वाढ झाली आहे. तर पुण्याच्या जवळ असणाऱ्या पिंपरी-चिंचवड मध्ये देखील कोरोनाची स्थिती अधिक गंभीर होत चालली आहे. पिंपरी चिंचवड मध्ये संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना दुचाकी चालकांना पोलिस काठीचा प्रसाद देत आहेत.

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी पुणेकरांवर कडक निर्बंध लाधले आहेत. कुठल्याही कौटुंबिक कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त जण सहभागी होऊ शकत नाही. इतकचं काय तर आता मंगल कार्यालयातील निर्बंधानंतर केटरींग व्यावसायिकांवरही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातले आहेत. 50 पेक्षा जास्त ताटं दिसल्यास केटरींग व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नियमांच पालन न केल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

आता हेच बघा ना नागरिकांनी नियम पाळावेत म्हणून पोलिसांनी अधिक लक्ष घालण्याच्या सुचना खुद्द पालकमंत्री अजित पवारांनी दिल्यात. मग आता दादांच्या सुचना येताच पोलीस जोमाने कामाला लागले आणि नागरिकांना काठ्यांचा प्रसाद सुरु झाला. पण हा विरोधाभास बघा.. एकीकडे पिंपरी-चिंचवडचे नागरिक बाहेर पडताच त्यांच्यावर नियम मोडल्याची कारवाई होते अन् भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आपल्या लेकीचा कुंकुम-तिलक कार्यक्रम मोठ्या थाटात पार पाडतात.

लांडगे

काल ( १४ मार्च ) भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांची कन्या साक्षी हिचा कुंकुम-तिलक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला भाजपच्या स्थानिकसह बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती. पण येथे ना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले गेले ना कोणाच्या तोंडावर मास्क दिसले. मग कडक संचारबंदीचे आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम फक्त सामान्य जनतेलाच आहेत का ? असा थेट प्रश्न आता सामान्य जनतेने विचारणे साहजिक आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि त्याचे फोटो देखील शेअर केले आहेत, म्हणजे आपण कोरोनाचे नियम कसे पायदळी तुडवत आहोत याची अप्रत्यक्ष अन् निर्लज्जपणे कबुलीच आमदार साहेबांनी दिली आहे.

पुण्यातील एका नामांकित पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला आहे. या सोहळ्याच्या एक दिवस आधी महेश लांडगे यांनी कोरोनाचे नियम पाळत आम्ही हा सोहळा साजरा करणार आहोत असे जाहीर केले होते. कुटुंबातील मोजक्या लोकांच्या हजेरीत हा कार्यक्रम करणार असल्याचे लांडगे यांनी सांगितले होते. मात्र झाले याच्या अगदी उलटे. प्रशासनाने घालून दिलेले नियम या कार्यक्रमात अक्षरशः पायदळी तुडवले गेल्याचे सरळ सरळ दिसत असताना, पोलीस आयुक्त आणि जिल्हा प्रशासन ‘लोकप्रतिनिधी’ यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस दाखवणार की सामान्य जनतेच्या पृष्ठभागावर काठीचा प्रसाद देण्यातच आपली धन्यता मानणार हे पाहूच…

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!