मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्यावर्षी पासून राज्यासह देशभरात कोरोना रोगाने माजवलेल्या हाहाकारामुळे शैक्षणिक क्षेत्रला देखील मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, दरवर्षी मार्च-एप्रिल मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या राज्य बोर्डाच्या परीक्षा एप्रिल-मे मध्ये घेण्याचे बोर्डाने जाहीर केले होते. मात्र, कोरोनाच्या थैमानामुळे दहावीच्या परीक्षा रद्द तर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले होते. हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेलं आहे.
तर, विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये परीक्षांचा निकाल, पुढील प्रवेश याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, आज वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल कधी व कोणत्या पद्धतीने लागणार याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना निकालाबाबत समाधान नसेल त्यांच्यासाठी श्रेणी सुधार योजनेअंतर्गत दोन संधी उपलब्ध राहतील, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दहावीच्या निकालाचे निकष –
वर्षातील लेखी मूल्यमापन – 30 गुण
दहावीचे गृहपाठ, तोंडी किंवा प्रात्यक्षिक अंतर्गत – 20 गुण
नववीचा विषयानिहाय गुण – 50 गुण
मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल लावताना 9 वी व10 वी साठी सुधारित मूल्यमापन योजना शासन निर्णय 08 ऑगस्ट2019 नुसार मूल्यमापन तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा निकाल हा 100 गुणांचा असेल. शैक्षविक वर्ष 2020-21 साठी इ.10 वी परीक्षेचा अंतिम निकाल खालील निकषांच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे.
अकरावीचे प्रवेश कसे होणार ?
अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन सीईटी परीक्षा घेण्यात येणार असल्याचं देखील वर्षा गायकवाड यांनी सांगितले. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक सीईटी परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर अवलंबून असतील. अकरावी प्रवेश प्रक्रिया राबवताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय, ‘असा’ लागणार दहावीचा निकाल
- अश्विनने आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर केला खुलासा ; झोपेशिवाय 8-9 दिवस खेळला सामने
- बीडमध्ये कोरोनातून बरे होणाऱ्यांच्या संख्येत वाढ!
- अभिनेत्री झरीन खानच्या आईची तब्येत ढासळली; प्रार्थना करण्याचं केले आवाहान
- “काँग्रेस मंत्र्यांसाठी बहुजनांच्या हितापेक्षा दारू विक्रेत्यांकडून मिळणाऱ्या ‘मेव्या’चा ‘हेवा’ जास्त”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

