Share

मुक्काम पोस्ट पिंपरी चिंचवड, धोनीचा नवा पत्ता

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा स्थगित केली.आता ही उर्वरीत स्पर्धा लवकर सुरु होणार नसल्याने आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेले खेळाडू आपल्या घरी परतले आहेत.

घरी परतल्यांनंतर खेळाडू कसा आपला वेळ घालवत आहेत. असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. त्यामध्ये धोनीचे चाहते नेहमी त्याला पाहायला उत्सुक असतात. धोनी सोशल मीडियापासून दूर असला तरी त्याची पत्नी साक्षी धोनी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. साक्षी नेहमी धोनी आणि मुलीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

याच दरम्यान चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. धोनीने चक्क पिंपरी चिंचवड परिसरात नवीन घरं घेतलं आहे. रांचीहून थेट धोनीनं पुण्यात घर घेण्याचा निर्णय घेतला. धोनीला पिंपरी-चिंचवड परिसरातील घर घेतलेल्या ठिकाणचं वातावरण आवडलं आणि त्याने घर घेण्याचं निश्चित केलं.

आयपीएल मॅच खेळण्यासाठी धोनीला संघासोबत पुण्यातील गहुंजे स्टेडियमला यावं लागायचं. गहुंजे स्टेडियम परिसरातील निसर्गरम्य वातावरण पाहून धोनी प्रभावित झाला आणि त्यांनी या परिसरात घर घेतलं अशीही एक चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!