Share

अंबाजोगाई येथील धक्कादायक प्रकार! कोविड केअर सेंटरमध्ये ‘ब्रदर’नेच केला नर्सचा विनयभंग

Published On: 

बीड: माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे घडला आहे. कोविड केअर सेंटरमध्ये कामाला असलेल्या एका ब्रदरने तिथेच काम करत असणाऱ्या एका नर्सचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. दीड महिन्यापासून पाठलाग करत असायचा त्यानंतर मंगळवारी रात्री थेट घरात घुसून त्याने तिचा विनयभंग केला.

पीडित नर्स सध्या लोखंडी सावरगावच्या रुग्णालयात कर्तव्य बजावत आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मागील दीड महिन्यापासून त्या राहत असलेल्या रूमचा रात्री-अपरात्री कुणीतरी दरवाजा ठोठावून जात असे. त्यांनी पाळत ठेवली असता त्यांच्यासोबत ब्रदर म्हणून काम करणारा अर्जुन अनंत फड (रा. दौंडवाडी, ता. परळी) हा दरवाजा ठोठावताना दिसून आला.

दुसऱ्या दिवशी पीडितेने अर्जुनला जाब विचारला असता तो तुमच्यासोबत लग्न करायचे म्हणू लागला. पीडितेने त्यास विवाहित असल्याचे सांगून यानंतर त्रास न देण्यासाठी बजावले. परंतु, अर्जुनने त्यांचा सतत पाठलाग सुरू केला. मंगळवारी रात्री साडेआठ वाजता पीडिता ड्यूटीवरून घरी परतली तेव्हा अर्जुनने घरात घुसून तिचा विनयभंग केला. या वेळी पीडितेने आरडाओरडा करण्याची धमकी दिली तेव्हा अर्जुनने तिला जिवे मारण्याची धमकी दिली व तिथून तो निघून गेला. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून अर्जुन फड याच्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदवला. अद्याप त्याला अटक केलेली नाही. पुढील तपास पीएसआय मोनाली पवार करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!