Share

‘पवित्र रिश्ता २’ मध्ये ‘या’ कारणामुळे दिसणार नाही अभिनेत्री उषा नाडकर्णी

Published On: 

मुंबई : हिंदीमधील लोकप्रिय ठरलेली ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अल्पावधीतच या मालिकेने लोकांच्या मनात जागा निर्माण केली होती. विशेष म्हणजे या मलिकेतील अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांनी कलेली अर्चना-मानवची जोडी चांगलीच चर्चत होती. तसेच या मलिकेतील उषा नाडकर्णी यांची भूमिका देखील महत्त्वपूर्ण आणि लोकप्रिय होती. आता या मालिकेचा सीक्वल येणार असून, या मालिकेत अर्चनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अंकिता लोखंडे सीक्वल दिसणार आहे. मात्र आता या सीक्वलमध्ये उषा नाडकर्णी दिसणार नसल्याचे समोर आले आहे.

उषा नाडकर्णी यांचे वय सत्तरहून अधिक असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी ही मालिका करत नसल्याचे सांगितले आहे. उषा नाडकर्णी या डायबिटीज पेशंट आहेत, त्यामुळे आताच्या काळात आरोग्याचा विचार करता त्यांनी ही मालिकाच करत नसल्याचे जाहीर केले आहे. शिवाय त्यांच्या कुटुंबीयांनी देखील सध्याच्या कठीण काळात काम करण्यास नकार दिला आहे.

https://www.instagram.com/p/CG2Z6yBpyoB/?utm_source=ig_web_copy_link

उषा नाडकर्णी  यांनी गेले कित्येक वर्ष आपल्या अभिनयातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीत देखील त्यांचा प्रभाव असल्याचे पाहायला मिळते. एक वाईट सासू म्हणून त्यांची प्रतिमा असल्याचे त्यांच्या भूमिकेतून दिसते. मात्र खऱ्या आयुष्यात त्या खूप प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभावाच्या आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!