🕒 1 min read
अफगाणिस्तान : तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळविल्यानंतर तेथील भारतीयांना पुन्हा मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु आहेत. पुन्हा घरी परतण्यासाठी त्यातही भारतीय कुटुंब काबूल विमानतळावर जमा होत आहेत. दरम्यान, आता भारताला या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी रोज दोन विमानांच्या उड्डाणांना परवानगी मिळाली असून आता रोज दोन विमाने काबूल वरून भारतासाठी उड्डाण घेतील. या विमानांद्वारे आता अफगाणिस्तानमध्ये अडकलेले भारतीय मायदेशी परतणार आहेत.
अमेरिकन सैन्य सध्या काबूल विमानतळावर दाखल असून त्यांच्याकडून भारताला रोज दोन विमान फेऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच अमेरिका देखील अफगाणिस्तानमधील आपल्या नागरिकांना काबूलवर विमानतळावरून परत आणत आहे. सध्या काबूल विमानतळावर जवळपास ५ हजाराच्या संख्येने अमेरिकन व नाटो सैन्य दाखल आहे.
"The passengers were earlier evacuated from Kabul by an IAF aircraft," added MEA Spokesperson Arindam Bagchi pic.twitter.com/q0ykbMf7s9
— ANI (@ANI) August 21, 2021
दरम्यान, सद्यस्थितीस अफगाणिस्तानमधून अमेरिका आणि नाटो सैन्याद्वारे रोज २५ विमाने उड्डाण घेत आहेत. अमेरिकेची मुख्य उद्देश अफगाणिस्तानमध्ये अडकेलेल्या आपल्या नागरिकांना आणि अफगाणिस्तानमधील ज्या नागरिकांना देश सोडायचा आहे, त्यांना वाचविण्यात येत आहे. तसेच सैन्य दलाच्या विमानांद्वारे नागरिकांना काबूल विमानतळावरून बाहेर काढले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मंदिरे हा केवळ भावनेचा नव्हे तर अर्थकारणाचा विषय ; त्वरित सर्व मंदिरे उघडा’
- ‘गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा’ ; खासदार संभाजीराजे आक्रमक
- खासदार नवनीत राणांवर मानहानीचा दावा ठोकणार, यशोमती ठाकूर यांचा इशारा
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
- पोलिसांना दिलेले चॅलेंज अंगलट! बैलगाडी शर्यत प्रकरणी पडळकरांसह ४१ कार्यकर्त्यांवर गुन्हा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
