🕒 1 min read
पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयवादाचा आरोप लावल्यापासून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या जन्मापासून जातीपातीच्या राजकारणाला सुरुवात झाली. हे सगळ्याच पक्षांना माहिती आहे परंतु मी एकटा बोललो. महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांचा मूळ विचार हवाय. जातीपातीच्या राजकारणातून आपण बाहेर पडलं पाहिजे असं विधान राज ठाकरेंनी केले होते.
राज ठाकरेंच्या आरोपावरुन राष्ट्रवादी काँग्रेसमधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी इंदापूर येथे राज ठाकरेंचा आरोपाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सुळे म्हणाल्या की, ‘हे दडपशाहीचं सरकार नाही. प्रत्येकाला त्याचे मत मांडण्याचा अधिकार आहे. अशा बोलण्यान ते काय खरे होत नाही.’
दरम्यान, राज ठाकरेंच्या टीकेला अजित पवार यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. ‘शरद पवार साहेबांनी कायमच पुरोगामी विचार मांडले आहेत, हे सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला माहिती आहे. कधी तरी काही लोकं असं बोलून जातात, मात्र त्याला महत्व देण्याचं काम नाही’, अशा शब्दात अजित पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
शरद पवारांच्या प्रतिक्रियेनंतर राज ठाकरे यांनी शुक्रवारी पुणे दौऱ्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांना उत्तर दिले होते. ‘आधी प्रत्येकाला स्वत:च्या जातीबद्दल अभिमान होता. पण अन्य जातींबद्दल द्वेष राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर निर्माण झाला, असं मी एकटाच बोललो. मला प्रबोधनकार वाचण्याचा सल्ला देण्यात आला. मी सर्वांची पुस्तकं वाचलेत. प्रबोधनकरांचं संदर्भ त्या त्या काळातले होते. माझ्या आजोबांचे लिखाण आपल्याला हवे तसे घ्यायचे असे चालणार नाही. मी यशवंतरावांचंही वाचलं आहे, त्यांचेही मत काय होतं हेही मला माहिती आहे’, असा जोरदार टोला राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला लगावला.
महत्त्वाच्या बातम्या
- पोलिसांना दिलेले चॅलेंज अंगलट! बैलगाडी शर्यत प्रकरणी पडळकरांसह ४१ कार्यकर्त्यांवर गुन्हा
- पंकजा तर होत्याच, पण आता नाना पटोलेंच्या भूमिकेमुळेही धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली
- ‘जो स्वत: सांड आहे तो दुसऱ्याला सांड म्हणतोय’, रावसाहेब दानवेंवर पलटवार
- ‘राहुल गांधी हे देवाला सोडलेले वळू’, रावसाहेब दानवेंचे वादग्रस्त वक्तव्य
- ‘आगामी लोकसभा निवडणूक भाजपविरोधात एकत्रच लढवूयात!’, सोनिया गांधींचे विरोधी पक्षांना आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
