Share

‘मंदिरे हा केवळ भावनेचा नव्हे तर अर्थकारणाचा विषय ; त्वरित सर्व मंदिरे उघडा’

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लादले होते. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारकडून अनेक निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्स, उद्यानेही खुली करण्यात आली आहे. मात्र राज्यातील मंदिरे अद्यापही खुली करण्यास परवानगी मिळाली नाही. यावरुन भाजप राज्य सरकारवर वारंवार टीका करत आहे.

दरम्यान आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील महाराष्ट्रातील सर्व मंदिरे उघडण्याची मागणी केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ट्वीट करून ही मागणी केली आहे. ते त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले कि, ‘केवळ मंदिरे उघडल्याने कोरोना चा प्रसार होतो असे कोणत्या सर्वेक्षणात आले आहे का? मंदिरे हा केवळ भावनेचा नव्हे तर अनेक शहरांच्या अर्थकारणाचा विषय आहे. त्वरित सर्व मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घ्यावा. तसेच जशी नियमावली सगळ्यांना लागू होते तशीच इथेही लागू करावी.’ अशी मागणी त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारकडे केली आहे.

तर दुसरीकडे भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. वारंवार विनवण्या करुन सुध्दा मंदिरं उघडली जात नाहीत. मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो गरीबांचं दुःख या सरकारला समजत नाही, आमचे देव दीर्घकाळापर्यंत कडी-कुलपात बंदिस्त करुन ठेवले आहेत. ही या ठाकरे सरकारची तालिबानी मानसिकता आहे. सोमवार पर्यंत मंदिरं उघडा नाहीतर राज्यव्यापी आंदोलन होणार असा इशारा भोसले यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!