Share

खासदार नवनीत राणांवर मानहानीचा दावा ठोकणार, यशोमती ठाकूर यांचा इशारा

Published On: 

बुलडाणा : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर आपण लवकरच मानहानीचा दावा ठोकणार असल्याचा इशारा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी दिला आहे. बुलडाणा जिल्ह्यात आल्या असता त्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होत्या. खासदार राणा यांनी केलेले सर्व आरोपही त्यांनी फेटाळून लावले आहेत.

खासदार नवनीत राणा यांनी ठाकूर यांना खुले आवाहन देत त्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले होते. अमरावती जिल्ह्यात कुपोषणामुळे बालकांचे मृत्यू झाल्याचा आरोपही राणा यांनी केला होता.  इतकेच नाही तर, यशोमती ठाकूर यांनी स्वत:च चौकशी समितीच्या मार्फत चौकशी करण्याचे आव्हान देखील त्यांनी दिले होते. यावर आपण आता त्यांच्यावर मानहानीचा दावा करणार असल्याचे अॅड. यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

यशोमती ठाकूर यांनी खासदार राणा यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. तर खासदार नवनीत राणा या नेहमीच वायफळ बोलतात त्यांना त्याची सवय आहे, असे सांगत आपण त्यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती दिली. मंत्री ठाकूर यांच्या या इशाऱ्यानंतर आता खासदार राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!