मुंबई : काल नांदेड शहरात मराठा आरक्षणासाठीच्या मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेत मराठा समाजाची भूमिका मांडली होती. दरम्यान आता मराठा आरक्षणासाठी विनापरवाना मुकआंदोलन करून जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी वजिराबाद पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शुक्रवारी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणासाठी मुक आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये आयोजकांनी जनसमुदाय एकत्र जमवून जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढेल, असे घातक कृत्य केल्याने गुन्हे दाखल झाले आहेत. मराठा मूक आंदोलन प्रकरणी 21 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोव्हिड काळात गर्दी जमवल्या प्रकरणी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वजिराबाद पोलिस ठाण्यात हे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
दरम्यान यानंतर आता खासदार संभाजीराजे छत्रपती हे चांगलेच आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळत आहेत. खासदार संभाजीराजे यांनी याबाबत ट्वीट करत त्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला आहे. ‘गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा, सामान्य गरीब मराठा बांधवांच्यावर का ?समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत. राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का ?’ असा संतप्त त्यांनी उपस्थित केला आहे.
गुन्हा दाखल करायचाच असेल तर माझ्यावर करा !
सामान्य गरीब मराठा बांधवांच्यावर का ?
समाजाच्या प्रश्नांसाठी नांदेड येथे एकत्र आलेल्या मराठा बांधवांवर प्रशासनाने कोविडचे कारण दाखवत गुन्हे दाखल केले आहेत.
राजकीय पक्षांना वेगळा न्याय आणि मराठा समाजाला वेगळा न्याय, असे का ? pic.twitter.com/y7uuqtA8Vq
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 21, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबानच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणं भारतीयांना पडलं महागात; १४ जणांना बेड्या
- मराठा मुक आंदोलनप्रकरणी नांदेडमध्ये २१ जणांवर गुन्हा दाखल
- एनसीएमध्ये प्रशिक्षण पुर्ण करताच इरफान पठानने व्यक्त केली ‘ही’ इच्छा
- राज ठाकरे यांचं म्हणणं पूर्णपणे सत्य- प्रवीण दरेकर
- पंकजा तर होत्याच, पण आता नाना पटोलेंच्या भूमिकेमुळेही धनंजय मुंडेंची डोकेदुखी वाढली


