Share

कोरोना स्थिती मागील वेळी पेक्षा आटोक्यात; श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या गणेशोत्सवाबाबत ट्रस्टने घेतला ‘हा’ निर्णय

Published On: 

पुणे : कोरोना महामारीने मागील वर्षीपासून जगभरात थैमान घातले आहे. बऱ्याच देशांमधील कोरोना महामारी आटोक्यात येत असली तरी भारतात मात्र अजूनही संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा कायम आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रासह देशभरात हाहाकार माजवला होता. यामुळे आता निर्बंधांमध्ये सूट देताना राज्य सरकार व प्रशासन हे गंभीरतेने विचार करूनच निर्णय घेत आहेत.

यंदा देखील कोरोनाचे सावट कायम असल्याने सर्व धर्मियांनी सण-उत्सव साधेपणाने साजरे करावे असे आवाहन केले जात आहे. गेल्यावर्षी प्रमाणेच यंदा देखील गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असं आवाहन करण्यात आलं असून राज्य सरकारने याबाबत नियमावली देखील जाहीर केली आहे. दरम्यान, पुण्यातील गणेशोत्सव हा संपूर्ण देशासह विदेशात देखील प्रसिद्ध आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा वारसा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव मागील वर्षी प्रमाणेच यंदा देखील साधेपणाने होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

पुण्यातील देखावे, मिरवणूका हे खास आकर्षण असतात. आता प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या गणेशोत्सवाबाबत ट्रस्टने आपला निर्णय जाहीर केला आहे. मूर्तीची प्राण-प्रतिष्ठापना मुख्य मंदिरातच होणार आहे. पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडीत सलग दुसऱ्या वर्षी मांडव उभा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सवादरम्यान मंडळाचे विश्वस्त आणि कार्यकर्ते दहा दिवस मंदिरात जाणार नाहीत. ऑगमेंटेड रिअॅलिटी या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन घरबसल्या गणेश भक्तांना दगडूशेठ गणपतीचं दर्शन मिळणार आहे. यासोबतच, हार, फुले, पेढे आणि नारळ स्वीकारले जाणार नाहीत, असंही मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलं आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या धोक्यामुळे भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!