Share

‘माझ्या हातावर असलेला ‘देवेंद्र’ चा टॅटू हा फडणवीसांचाच, तेच माझ्या मनात’

Published On: 

कराड : माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर अनेकदा हल्लाबोल केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. नरेंद्र पाटील यांनी लोकसभेची निवडणूक सातारा मतदार संघातून शिवसेना उमेदवार म्हणून लढवली होती. यानंतर त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला होता. दरम्यान, नरेंद्र पाटील यांनी स्वतःच्या डाव्या हाताच्या मनगटाखाली ‘देवेंद्र’ असा लिहिलेला टॅटू काढला आहे.

या टॅटूवरून मधल्या काळात ते चांगलेच चर्चेत आले होते. आता त्यांनी हा टॅटू विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीच असल्याचे जाहीर केले आहे. देवेंद्र फडणवीस सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा भावना नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत. ते कराडमध्ये बोलत होते.

विरोधीपक्ष नेते “देवेंद्र फडणवीस” यांचंच हे नाव कोरलं आहे, असं नरेंद्र पाटलांनी स्पष्ट केलं. पुढे ते म्हणाले, ‘त्याचं कारण म्हणजे एकदा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, की नरेंद्र पाटील हे आमच्या मनात आहेत आणि म्हणून देवेंद्रजी माझ्या मनात आहेत आणि फक्त मी त्यांचं नाव आता हातावर कोरलं आहे. आणि याचा मला आनंद आहे. मला खूप बरं वाटतंय कारण ते सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!