मुंबई : युपीए सरकारच्या काळात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनाची जगभरात चर्चा झाली होती. देशातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी महत्वाचे कायदे अस्तित्वात यावे यासाठी अण्णांनी आधीच्या सरकारच्या काळात आंदोलन केले होते. मात्र, ‘केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची केलेल्या अवस्थेवरून अण्णा गप्प का आहेत ? झोपले की काय?’ असे सवाल समाज माध्यमांमधून केला जात आहेत.
मधल्या काळात अण्णांनी मोदी सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मात्र केंद्र सरकार त्यांची समजूत काढण्यात यशस्वी झाले होते. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून एलपीजी सिलेंडरच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ पोहचत आहे. आता पुन्हा एकदा सामान्य लोकांना झटका बसला आहे. कारण आता पुन्हा एकदा आज 1 सप्टेंबर रोजी एलपीजी सिलिंडरमध्ये 25 रुपयांची वाढ झाली आहे. या प्रकरणी सर्वसामान्य जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस यांच्या किंमतीमध्ये होणाऱ्या वाढीवरून विरोधकांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईट क्रास्टो यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनाही चिमटा काढलाय. पेट्रोल पंप ‘गुडमॉर्निंग अण्णा’ बोलतोय तर गॅस सिलेंडर ‘आमच्यासाठी आंदोलन कधी?’ असा प्रश्न अण्णा हजारे यांना विचारत असल्याचे व्यंगचित्र क्रास्टो यांनी काढलं आहे.

जनताच कुंभकर्णासारखी झोपलीये, मी एकटाच कधीपर्यंत लढू? – अण्णा हजारे
‘माझं वय आता ८४ वर्षे आहे. मी कधीपर्यंत लढू? देश बचाव जनआंदोलन समिती युवकांनी स्थापन केली. यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही लढा उभा करा, मी तुमच्यासोबत अवश्य येईल. आतापर्यंत आपण आंदोलनं करून लोकहिताचे कायदे मंजूर करून घेतले. मात्र, आता सरकारला वाटेल ते कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर करण्यात येत आहेत. मागणी नसताना अनेक कायदे करण्यात येत आहेत. जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे. त्यामुळं सरकारलाही हे करणं शक्य होत आहे. जनतेनं आवाज उठवून सरकार बदलण्याची ताकद उभी केली पाहिजे, तेव्हाच सरकार झुकेल,’ असं हजारे यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापनेच्या हलचालींना वेग; सुशिक्षित लोकांसह महिलांनाही दिली जाणार संधी
- ‘माझ्या हातावर असलेला ‘देवेंद्र’ चा टॅटू हा फडणवीसांचाच, तेच माझ्या मनात’
- अनिल देशमुखांना हाय कोर्टाचा दणका; याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार
- प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी बोट धरुन सेनेला मराठवाड्यात आणलं- चंद्रकांत पाटील
- सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी कळताच शेहनाजला बसला धक्का
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

