🕒 1 min read
नवी दिल्ली : अमेरिकेने अफगाणिस्तानमधून काढता पाय घेतल्यानंतर तेथील परिस्थिती बिकट झाल्याचे चित्र दिसत आहे. भारताने अद्यापही तालिबानसोबत कोणतीही अधिकृत भूमिका घेतलेली नाहीये. त्यामुळे विरोधक मोदी सरकारवर टीका करत आहेत. त्यातच आता तालिबानसोबत भारताची कतार येथे चर्चा झाल्याच्या पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
भारताची तालिबानसोबत भेट हा भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा होऊ शकतो. त्यामुळे तालिबान ही संघटना दहशतवादी संघटना आहे किंवा नाही? हे केंद्र सरकारनं स्पष्ट करावं, अशी मागणी ओवेसींनी केली आहे. भारत सरकार तालिबानसोबत लपून छपून संबंध का ठेवत आहे?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
WATCH | "It's a matter of national security," AIMIM chief Asaduddin Owaisi raises questions on India ambassador to Qatar's meet with Taliban in Doha.
He said Centre must clear India's stand on Taliban whether Centre see them as a terrorist organisation or not? pic.twitter.com/ejEw3xf0A9
— ANI (@ANI) September 2, 2021
‘सरकार तालिबानसोबत लपूनछपून चर्चा का करत आहे? खुलेपणाने चर्चा का करत नाही? हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. त्यामुळे मोदी सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल. केंद्राने स्पष्ट करावे की ते तालिबानला दहशतवादी संघटना मानते की नाही? सरकार हे सांगायला का लाजत आहे? पडद्याआडून पाहत पाहत ते प्रेम का करत आहेत? असे प्रश्न विचारत ओवेंसीनी केंद्र सरकारला धारेवर धरले.
पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंधांबाबत बोलताना ओवेसी म्हणाले, ‘पाकिस्तान आणि तालिबानचं अस नात आहे जे कधी संपणार नाही. पाकिस्तानकडून तालिबानला संरक्षण देण्याची गोष्टही भारतानं मान्य केली आहे का? आपण त्यांना (पाकिस्तान) आपल्याकडे बोलवून चहा पाजतो, बिस्कटं खाऊ घालतो, कबाब खाऊ घालतो. जर पाकिस्तान त्यांचे तालिबानसोबतचे संबंध उघड करत असेल तर आपण त्यांना इथे बोलवून चहा पाजला पाहिजे का?’
महत्त्वाच्या बातम्या
- अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापनेच्या हलचालींना वेग; सुशिक्षित लोकांसह महिलांनाही दिली जाणार संधी
- एसबीआयच्या नावाने ‘हा’ मेसेज आल्यास व्हा सावध!
- अनिल देशमुखांना हाय कोर्टाचा दणका; याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार
- प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांनी बोट धरुन सेनेला मराठवाड्यात आणलं- चंद्रकांत पाटील
- सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी कळताच शेहनाजला बसला धक्का
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
