Share

‘महाराष्ट्रात सरकारमध्ये बसलेले लोक काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसलेत का?’

Published On: 

🕒 1 min read

कराड : मराठा आरक्षणाबाबत पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी महाविकास आघाडी सरकारवर भाजपसह इतर नेत्यांनी हल्लाबोल केला आहे. आता माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी देखील राज्य सरकारवर बोचरी टीका केली आहे.’महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजाबद्दल आस्था नाही, असा आरोप त्यांनी केलाय. ते आज कराडमध्ये बोलत होते.

‘महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजा बद्दल आस्था नाही, हे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 2021 – 2022 सालाकरिता फक्त साडे बारा कोटी रुपये तरतूद करुन दाखवुन दिलं आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे साडे बारा कोटी रुपये एक सप्टेंबरला वर्ग करत असल्याचं एक परिपत्रक मला मिळालं आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली आहे.

‘राज्यातील 30 हजार युवा उद्योजकांना या योजनेतून 200 कोटी रुपयांचं कर्ज वाटत करण्यात आलेलं आहे. दर महिन्याला 8 कोटी, तर दरवर्षी 96 कोटी रुपये व्याज परतावा केला जातो. या योजनेसाठी राज्य शासनाकडून केवळ साडे बारा कोटींची तरतूद केल्याने उद्योजक अडचणीत येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकारमध्ये जे लोक बसलेले आहेत ते काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का? ते मराठा समाजाबद्दल ब्र सुध्दा काढत नाहीत,’ असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी संताप व्यक्त केलाय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!