🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघ सध्या श्रीलंका आणि इंग्लंड दौऱ्यावर आहे. यादरम्यान श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाच्या कार्यक्रमात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यानंतर आगामी मालिकेसंदर्भात श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मालिका पुढे ढकलण्याचा महत्वपुर्ण निर्णय घेतला होता.
श्रीलंका क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बीसीसीआयने श्रीलंकेच्या खेळाडूंचे हॉटेल बदलण्याची विनंती केली होती. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ही विनंती मान्य केली आहे. या निर्णयानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांच्या क्रिकेट संघाला भारतीय खेळाडू राहत असलेल्या हॉटेलपेक्षा दिड किलोमीटर दुर असलेल्या हॉटेलमध्ये हलवले आहे. कोरोनाचा शिरकाव भारतीय संघात होऊ नये म्हणून बीसीसीआयने ही विनंती केली होती.
यादरम्यान भारताविरुद्धच्या मालिकेच्या वेळापत्रकातही थोडासा बदल करण्यात आला आहे. भारताविरुद्धची मालिका १३ जुलै ऐवजी १७ जुलैला सुरुवात होत आहे. एकदिवसीय मालिकेतील सामने आता १७, १९ आणि २१ जुलै रोजी खेळवीण्यात येणार आहे. तर टी-२० मालिका २१ जुलैच्या ऐवजी २४ जुलैपासुन सुरु होणार आहे. या मालिकेतील सामने २४, २५ आणि २७ जुलै दरम्यान होणार आहे. मात्र श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अद्याप भारताविरुद्धच्या संघाच्या कर्णधारपदाची घोषणा केलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना जी काही मदत लागेल ती करणार- सुप्रिया सुळे
- हरभजनच्या घरी दुसऱ्यांदा हलला पाळणा! गीताने दिला मुलाला जन्म
- ‘हा स्प्रे मी आमिरला द्याला हवा होता, त्यामुळे त्याचा घटस्फोट झाला नसता’; राखीचे अजब विधान
- रावसाहेब दानवे मोदींप्रमाणे १८ तास काम करणार! रेल्वे मंत्रालयाचे कामकाज चालणार दोन शिफ्टमध्ये
- निवडणुका रद्द…हे तर भाजपच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचे यश, भाजप आमदाराचा दावा


