Share

रावसाहेब दानवे मोदींप्रमाणे १८ तास काम करणार! रेल्वे मंत्रालयाचे कामकाज चालणार दोन शिफ्टमध्ये

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : रेल्वे मंत्रालयाच्या कामाला गती देण्यासाठी या विभागाचे कामकाज दोन शिफ्टमध्ये चालवण्याचा निर्णय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी घेतला आहे. शुक्रवारपासून याची अंमलबजावणी सुरू झाली. ही माहिती दानवे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी १८-१८ तास काम करतात. त्यापासूनच प्रेरणा घेत आम्ही हा निर्णय घेतल्याचे दानवे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकताच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात कोळसा व रेल्वे मंत्रालयाचा पदभार मिळालेल्या राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे ता चांगलेच कामाला लागले आहे. पदभार हाती घेतल्यानंतर रेल्वेतील कर्मचारी आता ऑन ड्युटी २४ तास राहणार, अशी घोषणाच दानवेंनी केली आहे.

आपले पंतप्रधान रोज १८ तासांहून जास्त काम करतात आणि देशाची सेवा करतात. मग आम्ही मंत्र्यांनीही तसे करावे. भारतीय रेल्वे ज्या प्रमाणे २४ तास सुरु असते त्याच धर्तीवर आता केंद्रीय रेल्वेमंत्री यांची कार्यालयंही दोन शिफ्ट मध्ये सुरु राहतील, असेही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं.

मंत्री वैष्णव व दानवे यांनी रेल्वे मंत्रालयाचे कामकाज अधिक गतीने व्हावे म्हणून आता कामकाज दोन शिफ्टमध्ये चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सकाळी ७ ते दुपारी ४ आणि ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत अशा दोन शिफ्ट असणार आहेत. या निर्णयामुळे कोरोनाचे नियम पाळता येतील, शिवाय मंत्री १८ तास कार्यालयात थांबत असल्याने ऐनवेळी लागणारी माहिती तातडीने उपलब्ध होऊ शकेल.

दरम्यान, मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दानवे यांनी मुंबईची लोकल सुरू करण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. ‘कोरोनामुळे मुंबईतील लोकल सर्वसामान्यांसाठी बंद आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून लोकल सेवा सुरू आहे. राज्याला कोरोनाची परिस्थिती माहिती आहे. जर लोकल सेवा सुरू करायची असेल तर त्याचे अधिकार हे राज्य सरकारकडे आहे, त्यांनी जर आमच्याकडे पत्रव्यवहार करून विनंती केली तर लगेच लोकल सेवा सुरू करू शकतो, असं दानवे यांनी सांगितलं. तसंच, ‘लोकल सेवा कधी सुरू करावी याबद्दल राज्य सरकारने केंद्राकडे माहिती द्यावी, असंही दानवे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!