Share

‘हा स्प्रे मी आमिरला द्याला हवा होता, त्यामुळे त्याचा घटस्फोट झाला नसता’; राखीचे अजब विधान

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आपल्या अजब-गजब वक्तव्यामुळे चर्चेत असलेली बॉलिवूडमधील कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखी सावंत ही पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात गेली होती. तिथे तिने खळबळजनक खुलासे केले होते. ‘बिग बॉस 14’ संपला. पण राखी सावंतची चर्चा मात्र संपली नाही कोणत्या न कोणत्या कारणामुळे राखी सतत चर्चेत येत आहे. आता तर राखीने हद्दच केली आहे.

यावेळी तिने चक्क आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटचं निमित्त साधून एका स्प्रे कंपनीची जाहिरात केली आहे. जर त्यांनी हा स्प्रे वापरला असता तर आज त्यांच्यावर घटस्फोट घेण्याची वेळ आली नसती असं विधान राखीनं केलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी यावरून तिला ट्रोल केले आहे.

https://www.instagram.com/p/CRGtgMqpmVY/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान राखी म्हणाली की, ‘मला पर्फ्युम, कपडे, साबण, ज्वेलरी अशा वस्तूची जाहिरात मिळावी अशी इच्छा होती. परंतु माझ्या नशिबात हा स्प्रे आहे. या स्प्रेचा वापर केल्यास तुमचा घटस्फोट कधी होणार नाही. हा स्प्रे मी आमिर खानला द्यायला हवा होता, त्यामुळे त्यांचा घटस्फोट झाला नसता.’ असे पुन्हा एकदा विचित्र विधान करून राखीने अनेकांचे लक्ष स्वतः कडे केंद्रित केले आहे. राखीच्या व्हिडीओची सध्या सोशल मिडियावर तूफान चर्चा होत असून अनेक लोकांना तिच्या या वागण्याचे हसू येत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!