पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने स्वप्नील लोणकर या तरुणाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही 2 वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्नील लोणकर हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल या आशेवर घेतलेलं कर्ज यांसारख्या कारणांमुळेही स्वप्नीलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा कडेलोट झाला आणि त्याने अखेर आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं होते.
त्यामुळे मागील काही दिवसांपासून याचे पडसाद राज्यभर उमटलेले पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय नेतेमंडळी स्वप्नीलच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियाची विचारपूस करत आहेत. आज स्वप्नीलच्या आईवडिलांची त्यांच्या मूळ गावी केडगाव, तालुका दौंड येथे जाऊन खासदार सुप्रिया सुळे यांनीही भेट घेतली. यावेळी त्यांनी स्वप्नीलच्या बहिनीसह संपूर्ण कुटुंबिय़ाचे सांत्वन केले.
यावेळी स्वप्निलच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. ‘लोणकर कुटुंबांना शासन मदत करणारच आहे. मात्र आम्ही देखील त्यांना जो काही सपोर्ट लागेल तो करणार आहोत’, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहेत. तसेच यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि, ‘स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयासोबत आम्ही चर्चा केली. या कुटुंबांला आम्ही मदत करण्यास तयार आहोत.
कशा प्रकारची मदत करता येईल याबाबत हे कुटुंब आम्हास कळवेल. आत्महत्येने प्रश्न सुटत नाहीत. उलट गुंता अधिक वाढतो. सरकार याबाबत लवकरात लवकर निर्णय घेईल. विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासही आम्ही तयार आहोत.’ असे त्या म्हणाल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी इतक्या टोकाची भूमिका न घेता चर्चेतून प्रश्न सोडवावे, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारची बाजू मांडलीच आहे. आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र सरकारसोबत बोलण्यासाठी मी पुढाकार घेईन आणि यावर नक्कीच मार्ग निघेल असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- हरभजनच्या घरी दुसऱ्यांदा हलला पाळणा! गीताने दिला मुलाला जन्म
- रावसाहेब दानवे मोदींप्रमाणे १८ तास काम करणार! रेल्वे मंत्रालयाचे कामकाज चालणार दोन शिफ्टमध्ये
- निवडणुका रद्द…हे तर भाजपच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचे यश, भाजप आमदाराचा दावा
- १९ वर्षानंतर ह्रतिक आणि सैफ पुन्हा एकत्र! दाक्षिणात्य ‘विक्रम वेधा’च्या रिमेकमध्ये झळकणार
- काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी उफाळली; नितीन राऊतांची पटोलेंविरुद्ध सोनियांकडे तक्रार


