Share

हरभजनच्या घरी दुसऱ्यांदा हलला पाळणा! गीताने दिला मुलाला जन्म

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटु हरभजन सिंग दुसऱ्यांदा बाबा बनला आहे. त्याची पत्नी अभिनेत्री गीता बसराने मुलाला जन्म दिला आहे. या दांपत्यांना यापुर्वी हिनाया नावाची एक मुलगी आहे.

भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटु हरभजन सिंगच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. हरभजनची पत्नी गीता बसराने नुकताच एका मुलाला जन्म दिला आहे. हरभजन सिंगने ट्विट करत ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. आयपीएल दरम्यान हरभजन आणि गीता बसरा हे दोघे एकमेकांना डेट करत होते. अनेक वर्षे डेट केल्यानंतर २०१५ मध्ये दोघांनी लग्न केले. लग्नानंतर एका वर्षातच त्यांना हिनाया नावाची मुलगी झाली होती.

हरभजन सिंग हा गेल्या काही वर्षापासुन भारतीय संघाबाहेर झाला आहे. २०१५ साली हरभजनने अखेरचा अंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. यानंतर मागील ५-६ वर्षात त्याला एकदाही पुनरागमनाची संधी मिळाली नाही. यादरम्यान तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडुन खेळत होता. मागील दोन वर्षापुर्वी त्याला केकेआरच्या संघाने विकत घेतले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!