Share

निवडणुका रद्द…हे तर भाजपच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचे यश, भाजप आमदाराचा दावा

Published On: 

🕒 1 min read

बुलडाणा : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाला दिलेले राजकीय आरक्षण रद्द ठरवले आहे. त्या नंतर महाराष्ट्र निवडणूक आयोगाने तत्काळ राज्यातील पाच जिल्ह्यापरिषदांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या होत्या. या निवडणुका रद्द करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली होती. तसेच राज्य सरकारच्या दुर्लक्षामुळेचे ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचा आरोप करण्यात आला होता. अखेर या पोटनिवडणुका स्थगित झाल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या आंदोलनाला यश मिळाले असल्याचा दावा भाजपच्या आदमार श्वेता महाले पाटील यांनी केला आहे.

ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाज नाराज होता. त्यातच लगेचच पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. भारतीय जनता पक्षाच्या वतीनेही राज्य सकरारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. या चक्काजाम आंदोलनामुळेच ओबीसी समाजावरील अन्याय कमी झाला असल्याचे आमदार श्वेता महाले यांनी म्हटले आहे.

या संदर्भात आमदार महाले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे भाजपच्या चक्काजाम आंदोलनाचे यश असल्याचा दावा केला आहे. त्या म्हणाल्या की, ‘देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र भाजपच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचे यश. OBC च्या राजकीय आरक्षण रद्द झाल्याने होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाने रद्द केल्या.’

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!