उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे मृत्यू पावण्याचे प्रमाण चिंताजनक पातळीवर असताना मंगळवारी अचानक हे प्रमाण कमी झाल्याने काही प्रमाणात चिंता कमी झाली. जिल्ह्यात मंगळवारच्या अहवालानुसार ५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला, गेल्या १२ तारखेपासून दररोजची ही संख्या १० पेक्षा अधिक होती.दरम्यान,मंगळवारी जिल्ह्यात ७२८ नवे रूग्ण आढळले असून, ६३४ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.
अपुऱ्या सुविधा, कमी मनुष्यबळ,साधनसामग्रीची कमतरता, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोना रुग्णांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळणे दुरापास्त झाले आहे. मात्र, अशा परिस्थितीत उपलब्ध यंत्रणा प्रयत्न करत आहे. मात्र, तुलनेने दररोज आढळणारे नवे रूग्ण आणि उपलब्ध यंत्रणा,यामध्ये मोठा फरक असल्याने रूग्ण गंभीर अवस्थेत जाऊन मृत्यू पावत आहेत. बहुतांश रुग्ण गंभीर स्थितीतच रूग्णालयात पोहोचत आहेत. कोरोनाने १२ एप्रिलला ५ जणांचा मृत्यू झाला. १३ तारखेला ७ जण दगावले, मात्र नंतर हे प्रमाण अत्यंत चिंताजनक पध्दतीने वाढत गेले.
दररोज किमान १० रूग्णांचा काेरोनाने बळी घेतला.१२ तारखेनंतर मंगळवारी प्रथमच हे प्रमाण कमी होऊन पाचवर आले. जिल्ह्यात आतापर्यंत कोेराेनाने ८७४ जण मृत्यू पावले आहेत. अजूनही कोरेानाचा आलेख वाढतच आहे. मंगळवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात ७२८ नवे रूग्ण आढळले असून, ही संख्या उस्मानाबाद शहरासह तालुक्यात सर्वाधिक २५४ आहे.त्यापाठोपाठ कळंब तालुक्यात ९३, उमरगा ९०, तुळजापूर ७१, भूम ६८,लोहारा ६६,वाशी ४६ व परंडा तालुक्यात ४० रूग्ण आढळले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- नाशिक ऑक्सिजन दुर्घटना, केंद्राकडून मृतांच्या वारसांना दोन लाखांची मदत
- लसींचे दर उत्पादकांवर सोपवल्यास काळाबाजार वाढेल, सचिन पायलट यांचा इशारा
- स्टाईलिश स्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण; चाहत्यांनी केली प्रार्थना
- ‘एक कोटी देतो, रेमडेसिविर द्या…रुग्णांचे जीव तरी वाचतील’; शिवसेना आमदाराचा संताप
- नायब राज्यपालांच्या हाती एकवटणार आता दिल्लीची सत्ता, नवा कायदा झाला लागू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

