Share

नायब राज्यपालांच्या हाती एकवटणार आता दिल्लीची सत्ता, नवा कायदा झाला लागू

Published On: 

नवी दिल्ली- दिल्लीत आता राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र शासन सुधारणा कायदा लागू करण्यात आला आहे. २७ एप्रिल म्हणजे कालपासून हा कायदा लागू झाला असल्याचं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. या कायद्यानुसार आता कोणताही निर्णय घेण्याआधी नायब राज्यपालांची परवानगी घेणं दिल्ली सरकारला बंधनकारक असणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दिल्ली या केंद्रशासीत प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळाचा कोणताही निर्णय लागू करण्यासाठी नायब राज्यपालांची संमती आवश्यक आहे. तसेच नायब राज्यपालांनी घेतलेला निर्णय लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळाच्या संमतीची गरज भासणार नाही. नायब राज्यपाल स्वतःच्या अधिकारात दिल्लीसाठी निर्णय घेऊ शकतील.

याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळाच्या निर्णयात बदल करणे अथवा तो रद्द करणे हा अधिकार नायब राज्यपालांकडे असेल. नव्या व्यवस्थेमुळे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ हे नामधारी उरणार आहे. या नव्या कायद्यानुसार, दिल्ली सरकारला कोणताही कार्यकारी निर्णय घ्यायचा असेल तर त्यापूर्वी राज्यपालांची परवानगी घ्यावी लागणार आहे.

दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे कायदेशीर प्रस्ताव हा किमान 15 दिवस आधी तर प्रशासनिक प्रस्ताव हा किमान 7 दिवस आधी आला पाहिजे. गेल्या महिन्यात २२ मार्च रोजी हे विधेयक लोकसभेत आणि २४ मार्च रोजी राज्यसभेत पारित करण्यात आलं होतं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!