Share

स्टाईलिश स्टार अल्लू अर्जुनला कोरोनाची लागण; चाहत्यांनी केली प्रार्थना

Published On: 

मुंबई : मागील वर्षभरापासुन भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. यावर्षी आलेली दुसरी लाटेने अधिक भयंकर रूप धारण केले आहे या लाटेत दररोज अनेक लोकांना कोरोनाची लागण होत असून, हजारो लोक आपला जीव गमावत आहेत. आता अनेक सेलिब्रिटीही या महामारीच्या विळख्यात अडकले आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनंतर आता तेलुगु सुपरस्टार अल्लू अर्जुन देखील कोरोना पॉझिटिव्ह आहे. ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली. यानंचक त्याच्या चाहत्यात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

अभिनेता अल्लूने  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘ माझी कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मी स्वत:ला घरीच क्वारंटाईन केले आणि तसेच कोरोनाशी संदर्भात सर्व नियमाचे पालन मी करत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना विनंती करतो की, त्यांनी देखील कोरोना चाचणी करून घ्यावी. घरी रहा, सुरक्षित रहा आणि संधी मिळेल तेव्हा लस टोचून घ्या. मी माझ्या सर्व हितचिंतकांना आणि चाहत्यांना विनंती करतो की, काळजी करण्याचे काही कारण नाही. माझी प्रकृती व्यवस्थित आहे.’

या पोस्टनंतर अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी त्याच्या चांगल्या स्वस्थ्यासाठी प्रार्थना करत आहे. आपल्या लाडक्या कलाकाराची प्रकृती लवकरात लवकर चांगली व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान, अल्लू अर्जुन काही दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासमवेत सुट्टी घालवण्यासाठी मालदीवमध्ये गेला होता. यानंतर तो आपल्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाला. त्याच्या वाढदिवसादिवशीच त्याने त्याच्या आगामी ‘पुष्पा’ चित्रपटाचा टीझरही रिलीज केला होता, जो त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांनी पंसती दर्शवली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!