Share

कोरोनामुळे झालेले मृत्यू म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाने केलेली हत्या- खासदार जलील

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : राज्यात आरोग्य यंत्रणा सक्षम नाही, त्यामुळे अनेक कोरोना रुग्णांना जीव गमवावा लागला. राज्यातील मृत्यूदरही इतर राज्यांच्या तुलनेने जास्त आहे. या कोरोना काळात झालेले सर्व मृत्यू म्हणजे केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी थंड डोक्याने केलेली हत्या असल्याची टिका औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

राज्यात सर्वच जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यात ऑक्सिजन आणि इतर आरोग्य सुविधा नसल्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. नाशिकमध्येही ऑक्सिजनची गळती झाल्याने आज २२ रुग्णांना जीव गमवावा लागला. या सर्व मृत्यूला केंद्र आणि राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप खासदार जलील यांनी केला आहे.

या संदर्भात खासदार जलील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘कोरोनामुळे आज होणारा प्रत्येक मृत्यू हा केंद्र आणि राज्य सरकारकडून होणारी हत्या आहे. इतके वर्ष आपल्या वैद्यकीय पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष केले. आता आपण जे करत आहात, त्याला खुप उशीर झालेला आहे.’

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!