Share

‘चीनला पूर्व लडाखमधून सैन्य मागे घ्यावेच लागेल’, भारताने सुनावले

Published On: 

नवी दिल्ली : चीनने पूर्व लडाखमधील काही मोक्याच्या ठिकाणांवर सैन्य तैन्यात केलेत. ते सैन्य माघार घेण्यास नकार देणाऱ्या चीनला भारताने पुन्हा एकदा खडेबोल सुनावलेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) शांतता राखण्यासंबंधी उभय देशांच्या नेत्यांत सहमती झालेली आहे. ती सहमती गालिच्याखाली झाकली जाऊ शकत नाही. गंभीर घटनांमुळे ताणलेले द्विपक्षीय संबंध रुळावर आणण्यासाठी चीनला पूर्व लडाखमधून आपले सैन्य मागे घ्यावेच लागेल, असा इशारा भारताने दिलाय.

भारताचे चीनमधील राजदूत विक्रम मिस्त्री यांनी ‘आयसीडब्ल्यूए’-‘सीपीआयएफए’च्या व्हर्च्युअल परिषदेत सहभाग घेतला. मिस्त्रींनीचिनी अधिकाऱ्यांच्या सीमेवर शांतता प्रस्थापित करण्याच्या दोन्ही देशांच्या नेतृत्वांच्या सहमतीकडे दुर्लक्ष करण्यावर सवाल उपस्थित केला. सध्याच्या बहुध्रुविय जगात कोणताही देश करार आणि सल्लामसलतीशिवाय आपला स्वत:चा अजेंडा ठरवू शकत नाही. त्यानंतर सर्वांच्या सहमतीची अपेक्षा ठेवू शकत नाही.

परिषदेत चीनच्या ‘बेल्ट अँड रोड उपक्रम’ (बीआरआय) व ‘पीओके’तून जाणाऱ्या ‘चीन-पाक आर्थिक कॉरिडोर’चा (सीपेक) या प्रकल्पावर मिस्त्री यांनी भाष्य केले. भारताने या दोन्ही प्रकल्पांवर आक्षेप नोंदवला आहे. भारत-चीनमध्ये चांगले संबंध आहेत, यात दुमत नाही. दोन्ही देशांच्या नेत्यांनीही एलएसीवर शांतता कायम ठेवण्यावर सहमती दर्शवली आहे. ही सहमती आपल्याला गालिच्याखाली झाकून ठेवता येणार नाही. चिनी अधिकारी या सहमतीकडे दुर्लक्ष का करत आहेत हे समजत नाही, असे मिस्त्री म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!