मुंबई : नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टाकीच्या पाईप लाईनला आज बुधवारी साडेबाराच्या सुमारास गळती लागली. आतापर्यंत या दुर्घटनेमुळे ऑक्सिजन अभावी २२ रुग्णांचा मृत्यू झाला असून हा आकडा अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे प्रकरण गंभीर असून तब्बल २ तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती विदारक असल्याचे दिसून आले. या प्रकरणी देशभरातून दु:ख व्यक्त होत आहे.
केंद्रिय राज्यमंत्री यांनीही या प्रकरणी शोक व्यक्त केला आहे. ”ऑक्सिजन पुरवठया अभावी व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २२ रुग्णांचा नाशिकमध्ये मृत्यू झाला. अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना घडली आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी. ऑक्सिजन पुरवठ्या अभावी असे मृत्यूचे थैमान इतर कुठेही घडू नये याची खबरदारी राज्य सरकारने घ्यावी” असे आवाहन आठवले यांनी केले आहे.
ऑक्सिजन पुरवठया अभावी व्हेंटिलेटरवर असणाऱ्या 22 रुग्णांचा नाशिक मध्ये मृत्यू झाला. अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना घडली आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी.ऑक्सिजन पुरवठ्या अभावी असे मृत्यूचे थैमान इतर कुठेही घडू नये याची खबरदारी राज्य सरकारने घ्यावी.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) April 21, 2021
दरम्यान, या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘चीनला पूर्व लडाखमधून सैन्य मागे घ्यावेच लागेल’, भारताने सुनावले
- अमेरिकेच्या सुरक्षेसाठी मुस्लीम देशांवर प्रवासबंदी घाला, ट्रम्पचा बायडेन यांना सल्ला
- ‘केद्रांची लसीकरण मोहीम नोटबंदीप्रमाणेच, फायदा केवळ उद्योपतींनाच’, राहुल गांधींचा हल्लाबोल
- विदेशात लस विकल्याने देशात तुटवडा, ममतांचा पंतप्रधान मोदींवर आरोप
- केंद्राचे लस धोरण अत्यंत भेदभावपूर्ण, राहुल गांधींची टीका


