Share

कोरोनाची दुसरी लाट म्हणजे ‘मोदी-निर्मित Tragedy’: ममता बॅनर्जी

Published On: 

कोलकत्ता : देशात पुन्हा एकदा कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. मागील वेळीच्या लाटेपेक्षा यंदा अधिक रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य सेवा अपुऱ्या पडत आहेत. महाराष्ट्र, दिल्लीसह काही राज्यांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. देश पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे.

अशा परीस्थित पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल करत मोठा आरोप केला आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आणि तिचे व्यवस्थापन ‘मोदी-निर्मित Tragedy’ आहे, असे ममतांनी म्हटले आहे. तसेच, पश्चिम बंगालचे नेतृत्व ‘बंगाल इंजिन’ सरकारच करेल, मोदींचे ‘डबल इंजिन’ सरकार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला. त्या एका निवडणूक सभेत बोलत होत्या.

यावेळी बॅनर्जी म्हणाल्या कि, ‘कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वेगवान आहे. याला मी मोदी निर्मित ट्रॅजेडी म्हणेन, ना इंजंक्शन्स उपलब्ध आहेत, ना ऑक्सिजन, देशात एवढी कमतरता असतानाही लसींचे डोस आणि औषधी बाहेर पाठविली जात आहे.’ यावेळी ममतांनी, ही निवडणूक पश्चिम बंगालला वाचविण्याची आणि बंगाली मातांचा सन्मान वाचविण्याची लढाई आहे, असे म्हटले आहे.

देशात कोरोनाचे संकट आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. पण कोरोनामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्यानंतर आता भाजपनेही मोठा निर्णय घेतलाय. बंगालमध्ये होणाऱ्या भाजपच्या रॅलीत आता पाचशेपेक्षा अधिक लोकांचा सहभाग नसेल असे भाजपने स्पष्ट केलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य केंद्रीय मंत्र्यांच्या प्रचारसभांमध्ये फक्त पाचशे लोकांचीच उपस्थिती असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!