मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)मध्ये आज क्वालिफायर २ (Qualifier 2)चा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RR vs RCB) यांच्यात रंगत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात टॉस जिंकलेल्या राजस्थानने प्रथम गोलंदाजी करताना बंगळुरूला १५७ धावांवर रोखले. बंगळुरूकडून रजत पाटीदारने पुन्हा एकदा आधार देत अर्धशतक ठोकले. राजस्थानकडून प्रसिध कृष्णा आणि ओबेद मॅकॉय यांनी तिखट मारा केला.
बंगळुरूचा डाव
कप्तान फाफ डु प्लेसिससोबत सलामीला उतरलेल्या विराट कोहलीला आरसीबीसाठी चांगली सलामी देता आली नाही. राजस्थानचा वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाने विराटला (७) यष्टीपाठी झेलबाद केले. मागील सामन्यातील शतकवीर रजत पाटीदारने पुन्हा एकदा संघाला सावरत डु प्लेसिसोबत अर्धशतकी भागीदारी केली. ११व्या षटकात डु प्लेसिसला ओबेद मॅकॉयने अश्विनकरवी झेलबाद करत ही भागीदारी तोडली. डु प्लेसिसने ३ चौकारांसह २५ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने १३ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांसह २४ धावांची खेळी केली. १४व्या षटकात त्याला बोल्टने बाद केले. मॅकॉयने त्याचा सुंदर झेल घेतला. १५व्या षटकात पाटीदारने चहलला षटकार खेचत आपले अर्धशतक फलकावर लावले. पुढच्याच षटकात तो अश्विनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्याने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ५८ धावा केल्या. पाटीदारनंतर आरसीबीचा डाव गडगडला. १९व्या षटकात प्रसिध कृष्णाने दिनेश कार्तिक (६) आणि वानिंदू हसरंगा (०) यांना लागोपाठ चेंडूव तंबूचा मार्ग दाखवत आरसीबीला मोठ्या धावसंख्येकडे जाण्यापासून रोखले. २० षटकात बंगळुरूने ८ बाद १५७ धावा केल्या. राजस्थानकडून कृष्णा आणि मॅकॉय यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
A double-wicket over from @prasidh43! ???? ????#RCB lose Dinesh Karthik and Wanindu Hasaranga in the 19th over.
Follow the match ▶️ https://t.co/orwLrIaXo3 #TATAIPL | #RRvRCB | @rajasthanroyals pic.twitter.com/LEMK5L2ewO
— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2022
दोन्ही संघांची Playing 11
राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कप्तान), देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रवीचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिध कृष्णा, ओबेद मॅकॉय, युझवेंद्र चहल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कप्तान), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, मोहम्मद सिराज.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

