लडाख : लडाखच्या तुरतुक सेक्टरमध्ये भारतीय सैन्यदलाचे वाहन खोल दरीत कोसळल्यामुळे ७ जवानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर वाहनातील अन्य जवान जखमी झाले आहेत. या सैन्यदलाच्या या वाहनात एकूण २६ जवान प्रवास करत होते. जखमी जवानांना तातडीने उपचारासाठी दाखल केले आहेत. जखमी जवानांना सर्वोत्तम उपचार मिळावे यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती सैन्यांच्या सुत्रांकडून देण्यात आली आहे.
7 Indian Army soldiers lost their lives so far in a vehicle accident in Turtuk sector (Ladakh), grievous injuries to others too. Efforts on to ensure best medical care for injured, incl requisition of air effort from IAF to shift more serious ones to Western Command: Army Sources
— ANI (@ANI) May 27, 2022
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी ९ वाजता सैन्यदलाचा हे ट्रक वाहन परतपूर येथील ट्रांजित कॅम्पवरुन हानिफ सेक्टरकडे जात होते. जेव्हा हा ट्रक थोईस भागापासून सुमारे २५ किलोमीटर दूर आला तेव्हा ट्रकचालकाचे एका क्षणी अचानक वाहनावरील आपले नियंत्रण सुटले आणि ट्रक ५० ते ६० फूट खोल श्योक नदीत पडला. या आकस्मित अपघातात ७ जवानांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

