Share

मुंबई इंडियन्सला धडाकेबाज विजय मिळवून देणाऱ्या ‘या’ क्रिकेटरने घेतली अचानक निवृत्ती

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली- न्यूझीलंडचा २९ वर्षीय फलंदाज कोरे अँडरसनने न्यूझीलंड क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतली आहे. अमेरिकेतील आगामी टी२० क्रिकेट लीग खेळण्यासाठी तीन वर्षांचा करार केल्यानंतर अँडरसनने तातडीने न्यूझीलंड क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

वनडे क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम अँडरसनच्या नावावर आहे. त्याने न्यूझीलंडकडून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून ९३ सामने खेळले आहेत. यात त्याने २ शतके आणि १० अर्धशतकांसह २००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

दरम्यान, कोरे अंडरसन याने 2014 साली आयपीएलमध्ये मुंबईला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. यामुळे त्याचा क्रिकेटमधील दबदबा देखील वाढला होता. 2014 साली राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईला प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी 14.4 ओव्हरमध्ये 185 रनची गरज होती. तेव्हा कोरे अंडरसनने 44 बॉलमध्या नाबाद 95 रनची वादळी खेळी केली होती.

अंडरसनच्या या झंजावाती इनिंगमध्ये षटकार आणि चौकारांचा अक्षरशः पाउस पाडला होता. कोरे अंडरसनमुळेच मुंबईने 14.4 ओव्हरमध्ये 184 रन करून बरोबरी केली. यानंतर आदित्य तरेने 14.5 व्या ओव्हरला सिक्स मारून मुंबईला प्ले-ऑफमध्ये एन्ट्री केली होती.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!