Share

IPL 2023 | पोलार्डच्या निवृत्तीनंतर रोहित शर्माने शेअर केली पोस्ट, म्हणाला..

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: मुंबई इंडियन्स (Mumbai Indians MI) आयपीएल (IPL) मधील सर्वात यशस्वी संघ आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) च्या नेतृत्वाखाली या संघाने पाच वेळा आयपीएलचे जेतेपद आपल्या नावावर केले आहे. वेस्टइंडीज संघातील अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड (Kairen Pollard) 2010 पासून मुंबई इंडियन संघाचा भाग आहे. यामध्ये त्याने 189 सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्ससाठी पोलार्डने 28.67 च्या सरासरीने 3412 धावा केल्या आहेत. IPL 2023 रिटेन्शन डेडलाइनच्या काही तास आधी त्याने  आयपीएल मधून आपली निवृत्ती जाहीर केली होती. पोलार्डला संघामध्ये कायम ठेवले जाणार नाही याची कल्पना त्याला आधीच आली असल्याने त्यांनी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेतल्यानंतर पोलार्डने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. जी मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनीही इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर करून पोलार्डबाबत आपल्या भावना व्यक्त केले आहेत.

पोलार्डच्या निवृत्तीचे निर्णयानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया मांडली आहे.
रोहितने इंस्टाग्रामवर पोलार्ड सोबत एक फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ” पोलार्ड हा मुंबई इंडियन्ससाठी नेहमी एक दिग्गज खेळाडू राहिला आहे. त्याचबरोबर पोलार्डचा प्रभाव देखील खूप पडला आहे. तू मुंबईसाठी नेहमी मनापासून खेळला आहे.” पोलार्डसोबत फोटो शेअर करत रोहित शर्मांनी ही पोस्ट त्याच्या सोशल मीडिया अकाउंटला शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये पुढे तो म्हणाला आहे की, “मी त्याला खूप मिस करेल.” दरम्यान, निवृत्तीनंतर पोलाड मुंबई इंडियन संघाचा फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम करणार आहेत. आयपीएल 2023 पासूनच तो ही जबाबदारी सांभाळणार आहे.

मुंबई इंडियन्स या संघातून निवृत्ती घेतल्यानंतर ओलांडणे देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तो म्हणाला होता की, “मुंबई इंडियन्सला गुडबाय बोलताना मला खूप दुःख होत आहे. पण मी या संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी घेण्यास तयार आहे. त्याचबरोबर आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघासोबत मला तेरा वर्षे खेळण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. दरम्यान आता एक खेळाडू म्हणून मी हे सर्व मिस करेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!