Share

IPL 2023 | आयपीएल मधून पोलार्डने घेतली निवृत्ती, जाता जाता म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये अनेक संघांमध्ये बदल बघायला मिळत आहे. त्याचबरोबर बीसीसीआय (BCCI) ने 15 नोव्हेंबर पर्यंत सर्व फ्रेंचाईजींना आपल्या रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगितली आहे. तर, दुसरीकडे आयपीएल 2023 साठी मिनी ऑक्शन (Mini Auction) चे नियोजन देखील सुरू आहे. या ऑक्शन आधी कोलकत्ता नाईट रायडर्स (KKR) ने ट्रेनिंग विंडोतून लॉकी फर्ग्युसन आणि रहमानउल्ला गुरबाज यांना गुजरात टायटन्स कडून खरेदी केले आहे. त्याचबरोबर KKR ने दिल्ली कॅपिटल्स मधून शार्दुल ठाकूरला आपल्या संघात घेतले आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्स (MI) या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू किरॉन पोलार्ड (Kieron Pollard) याने आयपीएल मधून निवृत्ती घेतल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई इंडियन्स आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघ आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली या संघाने पाच वेळा आयपीएलचे जेतेपद आपल्या नावावर केले आहे. वेस्टइंडीज संघातील अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्ड 2010 पासून मुंबई इंडियन संघाचा भाग आहे. यामध्ये त्याने 189 सामने खेळले आहेत. मुंबई इंडियन्ससाठी पोलार्डने 28.67 च्या सरासरीने 3412 धावा केल्या आहेत.

किरॉन पोलार्डने जाता जाता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तुम्हाला आहे की,”आयपीएल मधून निवृत्त होण्याचा निर्णय घेणं मला सोपं नव्हतं. मला आणखी काही वर्ष खेळायची इच्छा होती. परंतु मुंबई इंडियन्स सोबत झालेल्या चर्चेनंतर मी आयपीएलमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्स सोबतचा माझा प्रवास अविश्वासनीय होता. यादरम्यान मी बरंच काही साध्य केलं आहे. त्यामुळे मी या संघाच्या विरोधात खेळू शकत नाही.” पोलार्डने  ट्विटर अकाउंट वर ही पोस्ट शेअर केली आहे.

पुढे तो म्हणाला, ” मुंबई इंडियन्सला गुडबाय बोलताना मला खूप दुःख होत आहे. पण मी या संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी घेण्यास तयार आहे. त्याचबरोबर आयपीएल मधील सर्वात यशस्वी संघासोबत मला तेरा वर्षे खेळण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. मात्र, एक खेळाडू म्हणून मी हे सर्व मिस करेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!