Share

IPL 2022 SRH vs PBKS : सन्मान राखण्यासाठी खेळणार..! पंजाब-हैदराबादमध्ये कोणाचा आहे वरचष्मा; वाचा सविस्तर!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा प्रवास आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज (SRH vs PBKS) यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता खेळला गेला. यापूर्वी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जचा ७ गडी राखून पराभव केला.

पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना केवळ औपचारिकता आहे. या हंगामात दोन्ही संघांनी १३ सामन्यात ६ विजय नोंदवले. हा सामना जो संघ जिंकेल तो गुणतालिकेत सहाव्या स्थानावर येईल. या सामन्यात केन विल्यमसनशिवाय सनरायझर्स हैदराबाद खेळणार आहे.

हेड-टू-हेड आकडेवारीत, सनरायझर्स हैदराबादचा पंजाब किंग्जविरुद्ध वरचष्मा आहे. आतापर्यंत १३ सामने हैदराबादने जिंकले आहेत, तर पंजाबने ६ सामन्यात विजय मिळवला आहे. पंजाब किंग्ज विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात एडन मार्करामने ४१ धावांची नाबाद खेळी खेळून आपल्या संघाला विजयापर्यंत नेले. शिखर धवनने हैदराबाद विरुद्धच्या ९ सामन्यात जवळपास २२६ धावा केल्या आहेत. त्याने आपल्या जुन्या संघाविरुद्ध अर्धशतक झळकावले असून त्याची सर्वोच्च धावसंख्या ७८ आहे.

भुवनेश्वर कुमारने आतापर्यंत पंजाबविरुद्ध खेळलेल्या १७ सामन्यात २६ विकेट घेतल्या आहेत. पंजाब किंग्जच्या सध्याच्या गोलंदाजांमध्ये, कगिसो रबाडाने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १५ विकेट घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!