Share

IPL 2022 : ना विराट, ना धोनी, ना रोहित..! बॉलिवूडचा ‘मिस्टर पर्फेक्शनिस्ट’ आमिर खानला पडलीय ‘या’ खेळाडूची भूरळ!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आयपीएल २०२२(IPL 2022)गाजलेल्या खेळाडूंच्या यादीत कोलकाता नाइट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंहचाही समावेश आहे. त्याने यंदाच्या हंगामात फक्त सात सामने खेळले आहे. परंतु या काही सामन्यात त्याने चांगलीच कामगिरी केले आहे. रिंकूने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात अवघ्या १५ चेंडूत ४० धावा करत संघाला विजयाच्या आतिशय जवळ घेऊन गेला होता. मात्र त्या सामन्यात कोलकाताला पराभव स्वीकारावा लागला आहे. त्याच्या या कामगिरीने चाहत्यांच्या मनात कायमच घर केलं आहे. आता बॉलिवूड अभिनेता आमिर खानही रिंकू सिंगचा चाहता झाला आहे.

रिंकूचे कौतुक करताना आमिर खान म्हणाला, रिंकूने जबरदस्त खेळी करून दाखवली. त्याने जवळपास सामना जिंकला होता. विजय असो वा पराजय, काही फरक पडत नाही. रिंकू तु मन जिकंल. रिंकू सिंहने आमिर खानच्या या कौतुकासाठी आभार मानले. रिंकू म्हणाला, धन्यवाद माझ्या फलंदाजीबद्दल तुम्हाला असे वाटले.

रिंकू सिंहची कामगिरी

रिंकू सिंहने आतापर्यंत प्रथम श्रेणीत ३० सामन्यांमध्ये ५ शतके आणि १६ अर्धशतक करत ६४.०८ सरासरीने २३०७ धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणीमध्ये सर्वोत्तम धावसंख्या नाबाद १६३ आहे. रिंकूने आतापर्यंत ४१ लिस्ट-ए सामने खेळले आहेत. ज्यात त्याने ५०.५० च्या सरासरीने १४१४ धावा केल्या आहेत. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये रिंकू सिंहच्या नावावर १ शतक आणि १२ अर्धशतके आहेत.

आयपीएल २०१७च्या लिलावात रिंकू सिंहला तेव्हाच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने १० लाख रुपयांना खरेदी केले होता. त्या हंगामात त्याला फक्त एकच सामना खेळायला भेटला. आयपीएल २०२२ च्या लिलावात रिकू सिंहला कोलकाताने ५५ लाख रुपयांना खरेदी केले आहे. रिंकूने आयपीएल २०२२ मध्ये सात सामन्यांमध्ये 34.८० च्या सरासरीने १७४ धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या: 

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!