Share

गरोदर मातांसाठी आनंदाची बातमी ! यापुढे मनपाच्या रुग्णालयांमध्ये होणार मोफत चाचण्या

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : गरोदर महिलांची तपासणी देशभरात मोफत केली जाते. औरंगाबादेत महापालिकेच्या रुग्णालयात, आरोग्य केंद्रात तपासणी शुल्क आकारण्यात येते. हा गंभीर प्रकार पर्यंत बंद करावा. गरोदर महिलांच्या विविध तपासण्या शासनाने नेमलेल्या महालॅब मार्फत करण्याचे आदेश मनपाचे नवनियुक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिले. यावेळी मनपाचे आरोग्य केंद्र व रुग्णालय अधिकाधिक सक्षम करून नागरिकांना भरपूर चांगल्या आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

गरोदर महिलांची आरोग्य तपासणी वैद्यकीय तपासणी मोफत करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. मात्र महापालिके अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या काही रुग्णालयांमध्ये आरोग्य केंद्रात रीतसर पावती देऊन महिलांकडून वसूल केली जाते. वास्तविक पाहता गरोदर महिलांच्या तपासण्या महालॅबमार्फत मोफत करायला हव्यात. २०१४ पासून मनपाद्वारे एका नियमाचा आधार देत गरोदर महिलांकडून वसुली करीत आहेत. हा प्रकार डॉ. मंडलेचा यांच्या निदर्शनास आल्यास त्यांनी त्वरित महालॅबचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोलावत समजावून सांगितले. यापुढे गरोदर महिलांच्या १०० टक्के तपासण्या महालॅबनेच केल्या पाहिजेत असे सांगितले.

गरोदर मातांची रक्त तपासणी व थायरॉईड तपासणी महालॅब कडून करून घेतल्या जातील. याबाबत विभागीय व्यवस्थापक व जिल्हा प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या. आरोग्य केंद्र व रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडरला फ्लोमीटर लावणे, इमर्जन्सी ट्रे बनविणे, डॉक्टरांनी गरोदर माता तपासणी नोंदी ठेवणे आदी त्रुटींबाबत दुरुस्तीच्या सूचना देऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या. काही आरोग्य केंद्रात व रुग्णालयात वापराविना नवीन हॉस्पिटल फर्निचर शिल्लक आहे ते साहित्य साहित्य इतर केंद्रात देण्याच्या सूचना दिल्यात तसेच इतर सुविधा व रिक्त पदांबाबत वरिष्ठांना कळविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!