नवी दिल्ली : देशातील कोरोना परिस्थितीवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ‘देशाला पीएम आवास नव्हे, श्वास हवा’, असं ट्विट राहुल यांनी केलं आहे. या ट्विटसोबत त्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत इंडिया गेट आहे. त्या ठिकाणी बांधकामासाठी खोदकाम केलेलं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत लोक तोंडाला मास्क लावून रिकामे ऑक्सिजन सिलिंडर घेऊन ऑक्सिजनसाठी रांगेत उभे असलेले दिसत आहेत.
देश को PM आवास नहीं, सांस चाहिए! pic.twitter.com/jvTkm7diBm
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 9, 2021
दरम्यान, केंद्र सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लसींवर लावण्यात आलेल्या जीएसटीचा मुद्दा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. जनतेचे प्राण गेले तरी चालतील; परंतु पंतप्रधानांची टॅक्स वसुली थांबणार नाही, असे उपरोधिक ट्विट राहुल यांनी केले. काँग्रेसशासित राज्यांनी कोरोनी लसींवर लावण्यात आलेल्या जीएसटीचा विरोध केला आहे.
जनता के प्राण जाएँ पर PM की टैक्स वसूली ना जाए!#GST
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 8, 2021
केंद्र सरकार राज्यांना कोरोना लसींवर पाच टक्के जीएसटी आकारत आहे. यामुळे राज्यांना कोरोना लसीच्या एक डोसवर १५ ते २० रुपये अतिरिक्त शुल्क मोजावे लागत आहे. विशेष म्हणजे सरकारने परदेशी कोरोना प्रतिबंधक लसी जीएसटीच्या कक्षेतून बाहेर ठेवल्या आहेत. त्यामुळे देशात तयार होणाऱ्या कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लसींवरच कर आकारणी होत आहे. अनेक राज्यांनी केंद्र सरकारला चिठ्ठी पाठवून लसी करमुक्त करण्याची मागणी केली आहे. कोरोनाविरोधी लढ्यात केंद्र सरकार सतत अपयशी ठरत असल्याची टीका राहुल गांधी करत असतात.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘योग्य कोण? तुम्ही की पंतप्रधान मोदी?’, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
- मारेंगे भी हम और बचायेंगे भी हम! कोरोना पसरवणाऱ्या चीनच्या लसीला ‘डब्ल्यूएचओ’ची मंजुरी
- ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख द्या’, परिवहन मंत्री परब यांची वडेट्टीवारांकडे मागणी
- आघाडीत बिघाडी? ‘काँग्रेस पक्ष विधानसभा स्वबळावर लढवणार’, नाना पटोलेंच्या घोषणेने राजकीय वर्तुळात खळबळ
- कोरोनाचा विस्फोट! अत्यंत गरज असेल तरच आरोपीला अटक करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

