कोलकाता : पश्चिम बंगाल जिंकण्याच्या अट्टहासापायी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने देशाला उद्ध्वस्त केले, असा घणाघात राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. बंगालची निवडणूक जिंकण्यात अपयश आल्यामुळेच भाजपने राज्यात हिंसाचार घडवून आणल्याचा आरोपही त्यांनी केली.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षपदी शनिवारी बिमान बंडोपाध्याय यांची निवड करण्यात आली. ते तिसऱ्यांदा या पदावर विराजमान झाले आहेत. यावेळी बोलताना ममतांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. भाजपला जनादेश मान्य नाही. निवडणूक जिंकण्यात अपयश आल्यामुळेच ते बनावट व्हिडीओ आणि संदेश पसरवून हिंसाचार भडकवत आहेत, असा आरोप ममतांनी केला. संसदेची नवी इमारत, पंतप्रधानांचे नवे निवासस्थान आणि पुतळ्यांवर ५० हजार कोटी रुपये खर्च करण्याऐवजी कोरोना लसीकरणाला सरकारचे प्राधान्य हवे, असे ममता म्हणाल्या.
देशात कोरोनाचे संकट गंभीर असतानादेखील गेले सहा महिने केंद्र सरकारने काहीच काम केले नाही. भाजप केवळ बंगाल जिंकण्याच्या उद्देशाने पेटून उठला होता. बंगाल ताब्यात घेण्यासाठी मोदींसह त्यांचे मंत्री गेल्या सहा महिन्यांपासून राज्यात तळ ठोकून होते. बंगालच्या जिंकण्याच्या त्यांच्या अट्टहासामुळेच आज देश उद्ध्वस्त झाला आहे, असे ममता म्हणाल्या. निवडणुकीच्या काळात राज्यात तैनात निमलष्करी दलांची कोरोना चाचणी झाली नव्हती आणि त्यांच्यामुळेच बंगालमध्ये कोरोना संसर्ग वाढला आहे, असा आरोपही त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘योग्य कोण? तुम्ही की पंतप्रधान मोदी?’, जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला
- मारेंगे भी हम और बचायेंगे भी हम! कोरोना पसरवणाऱ्या चीनच्या लसीला ‘डब्ल्यूएचओ’ची मंजुरी
- ‘एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख द्या’, परिवहन मंत्री परब यांची वडेट्टीवारांकडे मागणी
- आघाडीत बिघाडी? ‘काँग्रेस पक्ष विधानसभा स्वबळावर लढवणार’, नाना पटोलेंच्या घोषणेने राजकीय वर्तुळात खळबळ
- कोरोनाचा विस्फोट! अत्यंत गरज असेल तरच आरोपीला अटक करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
