🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघाचा श्रीलंका दौरा सुरुवातीपासूनच या ना त्या कारणाने सतत वादाचे कारण बनला आहे. सुरुवातीला कोरनाच्या प्रादुर्भावामुळे दौरा पुढे ढकलण्यात आला. यानंतर दौरा संपत आल्यावर पुन्हा एकदा कोरोनाने मालिकेत अडथळा निर्माण झाला.
यादरम्यान इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय संघातील काही खेळाडू जखमी झाले. यामुळे टीम इंडियाने निवड समीतीकडे बदली खेळाडूंची मागणी केली. यावर निवड समितीने पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव यांची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड केली. मात्र दुसऱ्या टी-२० सामन्यापुर्वी भारताचा अष्टपैलु खेळाडू कृणाल पांड्याला कोरोनाची लागण झाल्याने सुर्यकुमार आणि पृथ्वीच्या आगामी इंग्लंड दौऱ्यातील कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे.
पुर्वनियोजीत कार्यक्रमानुसार सुर्यकुमार आणि पृथ्वी शॉ दोघेही ३० जुलै रोजी इंग्लंडला रवाना होणार होते. यानंतर ते १० दिवस विलगीकरणात राहुन १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी उपलब्ध राहणार होते. मात्र भारतीय संघात कोरोनाच्या शिरकावामुळे त्यांना ७ दिवस श्रीलंकेत आयसोलेशनमध्ये रहावे लागणार आहे. त्यानंतर ते इंग्लंडला रवाना होऊ शकतात.
महत्त्वाच्या बातम्या
- डॉमीनोझ नंतर आता ‘या’ कंपनीने केली पदक विजेत्या खेळाडूंसाठी मोठी घोषणा
- पूरग्रस्तांना एमआयडीसीचा मदतीचा हाथ- सुभाष देसाई
- दिपिका कुमारीने अचूक ‘लक्ष्य भेद’त केला उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश
- ‘आम्हाला भीक नको, काम करायचयं’, अभिनेत्री मेघा घाडगेने व्यक्त केली भावना
- ‘गुजरात आणि महाराष्ट्र एकाच देशातील दोन राज्य; मग महाराष्ट्राला मदत एक वर्षानंतर तीही तुटपुंजी का ?


