Share

बापरे! अटल बोगद्याची सोनिया गांधींनी पायाभरणी केलेली कोनशिलाच चक्क गायब

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : हिमाचल प्रदेश मधल्या मनाली ते लडाख या दोन ठिकाणांना जोडणाऱ्या ‘रोहंताग अटल बोगदा’ या बोगद्याचे लोकार्पण नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते.हा बोगदा एकूण ९.२ किलोमीटर लांबीचा आहे.या बोगद्याचे भूमिपूजन काँग्रेसच्या काळात झाले होते.पण नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले.

या बोगद्याचे भूमिपूजन केंद्रात यु.पी.ए. अर्थात काँग्रेसचे सरकार असताना झाले होते. त्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते हा कार्यक्रम झाला होता. त्याची कोनशिला बोगद्यावर लावण्यात आली होती. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटनावेळी पायाभरणीची कोनशिला नसल्याचे अनेकांच्या लक्षात आले. या प्रकरणी काँग्रेसने भाजपवर आरोप केला आहे. भाजपने हे जाणीवपूर्वक केले असून, पायाभरणीची कोनशिला लावेपर्यंत आंदोलन करण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) या बोगद्याची उभारणी केली आहे. हा बोगदा पूर्ण होण्यास जवळपास दहा वर्षांचा कालावधी लागला आहे. या बोगद्यामुळे मनाली ते केलॉंग हे अंतर ४६ किलोमीटरने कमी झाले आहे. बोगद्याची रुंदी १०.५ मीटर असून, ८० किलोमीटर प्रतितास वेगाने गाड्या धावणार आहेत. प्रत्येक १५० मीटर अंतरावर बोगद्यात आपत्कालिन टेलिफोन यंत्रणा आहे. याचबरोबर प्रत्येक २५० मीटरवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

या बोगद्याच्या उद्घाटन कार्यक्रमाला नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, जयराम ठाकूर, अनुराग ठाकूर, जनरल बिपिन रावत, एम.एम.नरवणे, बीआरओचे महासंचालक लेप्टनंट जनरल हरपाल सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!