मुंबई : सुरुवातीला आईपीएल होईल की नाही याबद्दल शंका उपस्थित करण्यात येत होती कारण कोरोनामुळे परिस्थिती बिघडत चालली होती. सामने सुरू असताना प्रेक्षकांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून विनाप्रेक्षक सामने खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला यावर्षी आयपीएल भारतात होत नसून UAE असून, इंडियन प्रीमियर लीग 13 व्या सत्रात येऊन पोहचली आहे.
तसेच आय.पी.एल चे फॅन देशभरात बघायला मिळतात पण आता बॉलीवूड मधील छोटे स्टार देखील आय.पी.एल चे फॅन आहेत. बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूरने ‘छोटा नवाब’ क्रिकेट खेळत असतानाचा फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला व पोस्टमध्ये करिना तैमूरसाठी आयपीएलमधील एखाद्या संघात जागा शोधत आहे. करिना आजकाल तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर खूप अॅक्टिव असते, ती नेहमीच रंजक पोस्ट्स शेअर करते. करीनाच्या बर्याच पोस्ट्स ‘छोटा नवाब’ अर्थात तिचा मुलगा तैमूर अली खानशी संबंधित असतात.
https://www.instagram.com/p/CGSPFYAFmU9/?utm_source=ig_web_copy_link
करिनाने नुकत्याच टाकलेल्या ह्या पोस्टचीही बरीच चर्चा होत आहे. तैमूरचा फोटो पाहून तैमूरचे चाहते त्याच्या बद्दल असलेले प्रेम सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. यामध्ये बॉलीवूडमधील गर्ल गँगचा समावेश आहे. अमृता अरोरा आणि करिश्मा कपूर यांनी हार्ट इमोजी शेयर करून तैमूरबद्दल प्रेम व्यक्त केल आहे.
महत्वाच्या बातम्या-
- माझ्या आदेशानेच पाडवींचा राष्ट्रवादीत प्रवेश; एकनाथ खडसेंनी केला गौप्यस्फोट
- नाराज ओबीसी नेत्यांची मंत्री छगन भुजबळ व वडेट्टीवारांच्या घरी खलबतं!
- मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सरकारने चुकीचा सल्ला देऊ नये : विनोद पाटील
- नगर जिल्हा कोरोना मुक्तीच्या दिशेने; रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ९२.०६ टक्के
- महाराष्ट्रासह वीस राज्यांना खुल्या बाजारातून 68,825 कोटी रुपये कर्ज घेण्याची परवानगी


