टीम महाराष्ट्र देशा : बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांच्या आरजेडीने सरकार बनवले तर बिहार दहशतवाद्यांचा अड्डा बनेल.अशा शब्दात केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी टीका केली आहे. नित्यानंद हे वैशाली जिल्ह्यातील महनार येथे उमेश कुशवाह यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
ते पुढे असे म्हणाले की “काश्मीरमधून आम्ही ज्या दहशतवाद्यांना हाकलून लावत आहोत तेच येत्या काळात बिहारमध्ये आश्रय घेतील.पण आम्ही असे होऊ देणार नाही. पंतप्रधानांनी सीमेची जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे. गृहमंत्र्यांनीही ही जबाबदारी आमच्यावर सोपवली असून, आम्ही दहशतवाद्यांना येथे कदापी येऊ देणार नाही.”
येत्या काही दिवसातच बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात एकूण ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा ३ नोव्हेंबरला असून, यात एकूण ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात एकूण ७८ मतदारसंघ आहेत.या तीन टप्प्यात २४३ जागांसाठी मतदान होणार आहे.तर निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता जवळपास स्पष्ट झाले आहे. परिणामी निवडणुकीच्या प्रचाराला प्रचंड जोर चढला आहे. राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत.केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी वादग्रस्त विधान करुन वाद ओढवून घेतला आहे. त्यांचे वादग्रस्त विधान असलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, यावरुन त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.तार बऱ्याच लोकांकडून समर्थन देखील करण्यात येत आहे.
बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
- ओबीसी नेत्यांना किंमत दिली जात नाही, सरकारवर उघड नाराजी
- ‘आनंदीबाईनी राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून वेळीच बेताल बोलण्याला लगाम घालावा’
- विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी काँग्रेसकडून सत्यजित तांबेंच नावं चर्चेत!
- ‘छोटे नवाब’ तैमूरचा मनोरंजक फोटो सोशल मीडियावर व्हायरल
- कोरोनाच्या भितीने नगरमधील तिन्ही मंत्री घरात बसून- शिवाजी कर्डिले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

