Share

ओबीसी नेत्यांना किंमत दिली जात नाही, सरकारवर उघड नाराजी

Published On: 

मुंबई : ओबीसी समाजाला दुय्यम वागणूक मिळत असल्याची तक्रार ओबीसी समाजाकडून करण्यात येत आहे. सारथीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८ कोटींच्या निधीची तरतूद केली मात्र ओबीसी नेत्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्याची तसदी देखील त्यांनी घेतली नाही. त्यामुळे हे सरकार ओबीसी समाजासाठी काही करणार आहे की नाही? असा उद्विग्न सवाल ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरात विविध आंदोलनं मराठा समाजातर्फे करण्यात येत आहे. तर, मराठा आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत सर्व प्रकारच्या भरती परीक्षा रद्द करण्यात यावा यासाठी खासदार संभाजीराजे, खासदार उदयनराजेंसह मराठा संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा देखील दिला होता. यानंतर MPSC परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

तर, ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. ओबीसी नेत्यांकडून, मेगा भरती सुरू करा आणि ओबीसाला निधी मिळायलाच हवा, अशी मागणी करण्यात आली होती. धनगर समाजाचा १ हजार कोटींचा निधीही धूळ खात पडला असून ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी फक्त उपसमिती स्थापन करण्यात आल्याचंही यावेळी निदर्शनास आणून देण्यात आलं. ओबीसींच्या प्रश्नासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना जाब विचारण्यात आला होता. मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशाराही देण्यात आला.

ओबीसींच्या तोंडाला पाने पुसली तर सरकारविरोधात रस्त्यावर उतरावं लागेल, तहसिलदार कार्यालयावर आंदोलन करतानाच रास्ता रोको करण्याचा इशाराही देण्यात आला होता, असं सांगतानाच मंत्री विजय वडेट्टीवार यांनाही भेटून हीच मागणी करण्यात येणार असल्याचं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं. आमच्या समस्या ऐकायला कुणी तयार नाही. ओबीसी नेत्यांना किंमत दिली जात नाही. हे असंच ठेवायचं असेल तर ओबीसींचं खातं ठेवलं तरी कशाला? हे खातंच बरखास्त करा, अशी जाहीर नाराजी देखील ओबीसी नेत्यांनी व्यक्त केली असून प्रकाश शेंडगेंनी टीव्ही ९ शी बोलताना सरकारला आक्रमक इशारा देखील दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!