मुंबई : राज्य सरकारने प्रार्थनास्थळे खुली करण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. मंदिरं उघडण्याबाबत रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नकारात्मक संकेत दिल्यानंतर भाजप पुन्हा आक्रमक झाला आहे. मंदिरं खुली करण्यासाठी राज्यभरात भाजपकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. तर, काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंना पात्र लिहून मंदिरं खुली करण्यावरून खडेबोल सुनावले आहेत.
यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यपाल कोश्यारी यांना सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. तर, “राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना हात घातला हे योग्य नाही. कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरं बंद आहेत. राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्र लिहिले आहे का?” असा सवाल विचारत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पलटवार केला आहे.
दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यपालांना संविधानाची प्रत व प्रस्तावना पाठवत नोंदवला आहे. संविधानिक पदावर विराजमान असतानाही ‘सेक्युलर’ तत्त्वाचा विसर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पडला आहे, असा आरोप करत ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांच्या उपस्थितीत राज्यपालांना संविधानाची प्रत व प्रस्तावना पोस्टाने पाठवून निषेध नोंदवण्यात आला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सांगण्यात आले.
संविधानिक पदावर विराजमान असतानाही ‘सेक्युलर’ तत्त्वाचा विसर राज्यपाल @BSKoshyari यांना पडला आहे, असा आरोप करत ठाणे शहर जिल्हाध्यक्ष @paranjpe_anand आणि प्रदेश चिटणीस सुहास देसाई यांच्या उपस्थितीत राज्यपालांना संविधानाची प्रत व प्रस्तावना पोस्टाने पाठवून निषेध नोंदवण्यात आला. pic.twitter.com/JW1a7TqwUL
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) October 14, 2020
मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा राज्यपालांना अधिकार : प्रकाश आंबेडकर
तर, “राज्यपालांची भूमिका योग्यच आहे. केंद्राच्या निर्णयाचं पालन होतं की नाही, हे पाहण्याचा आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना जे प्रत्युत्तर दिलंय त्याचा आशय केवळ मंदिर उघडण्याबाबतचा आहे, असं सांगतानाच राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी पत्रव्यवहारात अदब पाळला नाही,” अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
- ओबीसी नेत्यांना किंमत दिली जात नाही, सरकारवर उघड नाराजी
- ‘आनंदीबाईनी राघोबादादाच्या भविष्याचा विचार करून वेळीच बेताल बोलण्याला लगाम घालावा’
- विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी काँग्रेसकडून सत्यजित तांबेंच नावं चर्चेत!
- ‘छोटे नवाब’ तैमूरचा मनोरंजक फोटो सोशल मीडियावर व्हायरल
- कोरोनाच्या भितीने नगरमधील तिन्ही मंत्री घरात बसून- शिवाजी कर्डिले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

