अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- महाराष्ट्रातील विधान परिषदेवरील राज्यपाल निर्देशित सदस्यांच्या १२ जागा रिकाम्या आहेत. विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी महाविकासआघाडी सरकारकडून अखेर नावे जवळपास निश्चित करण्यात आली आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
एकूण १२ जागांपैकी चार जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. त्यात काँग्रेसच्या संभाव्य नावांची यादी समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कला, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.
राजकीयदृष्ट्या सोय पाहता अनेकदा हे निकष बाजूला ठेवले जातात. मात्र, कधी कधी राज्यपाल हे निकष पूर्ण करण्याचा आग्रह धरतात. अशा वेळी राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष होऊ शकतो.
सत्यजित तांबे यांचे वडील डॉ.सुधीर तांबे हे सुद्धा विधान परिषदेचे आमदार आहे. गेल्या दीड दशकांपासून सत्यजित तांबे यांनी युवक काँग्रेस आणि NSUI च्या माध्यमातून युवकांना संघटित करण्याचे काम केले आहे. सत्यजित तांबे यांनी २०१४ साली अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.
परंतु त्यात त्यांना अपयश आले होते. तांबे यांनी दोन वेळा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांना काँग्रेसने संधी दिल्यास बाप-लेक एकाच वेळी विधान परिषदेच्या बाकावर बसलेले महाराष्ट्राला पाहायला मिळू शकतात.
महत्वाच्या बातम्या-
- माझ्या आदेशानेच पाडवींचा राष्ट्रवादीत प्रवेश; एकनाथ खडसेंनी केला गौप्यस्फोट
- नाराज ओबीसी नेत्यांची मंत्री छगन भुजबळ व वडेट्टीवारांच्या घरी खलबतं!
- मराठा समाजातील विद्यार्थ्यांना सरकारने चुकीचा सल्ला देऊ नये : विनोद पाटील
- ‘छोटे नवाब’ तैमूरचा मनोरंजक फोटो सोशल मीडियावर व्हायरल
- महाराष्ट्रासह वीस राज्यांना खुल्या बाजारातून 68,825 कोटी रुपये कर्ज घेण्याची परवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

