Share

दहीहंडी होणारच म्हणत चॅलेंज देणाऱ्या राम कदमांना समन्वय समितीचा खोचक टोला

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने सलग दुसऱ्या वर्षी दहीहंडी उत्सवाच्या आयोजनाला परवानगी नाकारली आहे. आज सोमवारी दुपारी दहीहंडी मंडळं, गोविंदा पथकांच्या समन्वय समितीसोबत बैठक घेण्यात आली. यानंतर दहीहंडीच्या आयोजनाला परवानगी नाकारण्यात आली. पण ही बैठक सुरु असतानाच भाजपाचे घाटकोपरमधील आमदार तथा भाजप प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला. काहीही झाले तर हिंदू दहीहंडी साजरी करणारच असे ओपन चॅलेंज ठाकरे सरकारला दिले आहे.

आजच्या बैठकीमध्ये समन्वय समितीने आपली बाजू मांडली आणि त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच टास्क फोर्सने या आयोजनाचे काय परिणाम होतील हे सविस्तर सांगितल्यानंतर समन्वय समितीला राज्य सरकारची भूमिका पटल्याने त्यांनी हा निर्णय स्वीकारल्याचं पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे. अशातच राम कदम यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असून आता समन्वय समितीने त्यांना टोला लगावला आहे.

पत्रकार परिषदेत समन्वय समितीला राम कदम यांच्याबाबत प्रश्न केला असता समन्वय समितीतील एका अधिकाऱ्याने उत्तर दिलं. ‘आम्ही निर्णय घेतल्यानंतर काही लोक आंदोलन करतात, विरोधी भूमिका घेतात असं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितल्याचं नमूद केलं. तसेच पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी, “कोरोनालाही आंदोलन करुन घालवा ना”, असं या विरोध करणाऱ्यांना सांगितल्याचं स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्याचं हे वक्तव्य राम कदम यांनाही लागू होतं,’ असा टोला समन्वय समितीने लगावलाय.

राम कदम नेमकं काय म्हणाले ?

‘काही गोविंदा पथक महाराष्ट्राच्या सरकारला त्यांच्या मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. एसी रूममधून सांगणार असाल दहीहंडी साजरी करायची नाही तर हिंदू बांधव ऐकणार नाही. आम्ही दहीहंडी करणार म्हणजे करणारचं…’ अशी ठाम भूमिका राम कदम यांनी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!