🕒 1 min read
ब्राम्हण संघाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींच्या वक्तव्याचा विरोध केला असून मिटकरींनी भाषणात लग्नविधीबाबत चुकीचा मंत्र सांगितला असं म्हटलंय. यावरून पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यलयाबाहेर ब्राम्हण महासंघाने जोरदार आंदोलन केलंय. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस आणि ब्राम्हण महासंघाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. ब्राम्हण महासंघाचे कार्यकर्ते गुरुजींच्या वेशात त्याठिकाणी गेले होते. यावेळी त्यांनी कार्यालयाच्या बाहेर शांतीपाठ करत घोषणाबाजी केली. त्यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये शारीरिक झटापट झाली.
आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली असल्याचा आरोप ब्राम्हण महासंघाकडून करण्यात येतोय.
महत्वाच्या बातम्या:
- “जात पात धर्म हे आमच्या अंगाला…” ; धनंजय मुंडेंनी केली अमोल मिटकरींची पाठराखण
- “देश विकून जर पोट भरलं नसेल तर…”- संजय राऊत
- “मुख्यमंत्र्यांवर टीका करा आणि Y दर्जाची सुरक्षा मिळवा ही केंद्र सरकारची…”, नीलम गोऱ्हेंची टीका
- IPL 2022 : रक्तातच क्रिकेट..! अर्जुन तेंडुलकरच्या भेदक ‘यॉर्कर’वर इशान किशन क्लीन बोल्ड; पाहा VIDEO!
- IPL 2022 MI vs CSK : मॅचपूर्वी चेन्नईच्या ‘स्टार’ खेळाडूनं सोडलं मैदान; ‘या’ कारणामुळं परतला मायदेशी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
